जगमान्य प्रेरणादायी घटक

जगमान्य प्रेरणादायी घटक

शिवाजी महाराज युद्धात जखमी झालेल्या सैनिकांना जखम पाहून ५,२५,५०,१०० होन औषधासाठी देत असत. शहीद सैनिकांच्या कुटुंबाला तह हयात म्हणजे आयुष्यभर अर्धवेतन पेनशन देत असत. निराधार झालेल्या बालकांना स्वतःच्या पैशातून शिक्षण देत आणि या सैनिकांच्या पोराचं शिक्षण पूर्ण झालं की त्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे लष्करी किंवा दप्तरी कामावर रुजू करुन घेत असत. विमा योजना जगात पहिली कोणी चालू केली तर आपल्या महाराजांनी आणि मेडीक्लेम पॉलीसी कोणी राबविली तर तीही आपल्या महाराजांनी. गोरगरीब सैनिकांच्या अनाथ मुलांसाठी बालपरवेशी गृह म्हणजे Boarding school काढलं. अगदी एखाद्या सैनिकाच्या मुलीचं लग्न पैशावाचून अडलं तर तो खर्चही महाराज करीत असत.

आणि मोहीम यशस्वी करणाऱ्या सैनिकाला महाराज सोन्याचं कडं देत ते कसं विसरुन चालेल. तानाजी मालुसरे प्रकरणानंतर तर महाराजांनी मावळा मोहिमेवर जातानाच त्याच्या हातात सोन्याचं कडं घालण्याची परंपरा सुरु करुन Incentives चे महत्व काय असतं ते आधुनिक व्यवस्थापन क्षेत्राला दाखवून दिलं. आता पैशा व्यतिरीक्त प्रेरणा देऊ शकतात अशा गोष्टी पाहूया.

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!