जगमान्य प्रेरणादायी घटक

जगमान्य प्रेरणादायी घटक

६. Job Enrichment:

जॉब इनरीचमेंट म्हणजे माणसांना कर्मचाऱ्यांना अनुयायांना आव्हानात्मक काम देणे. दिवसेंदिवस अवघडात अवघड कामे देऊन त्याचे मनोधैर्य वाढविणे आणि मोठ-मोठी कामे करण्याची त्यांना प्रेरणा देऊन संधी देणे. माणसाची क्षमता पाहून त्याला तो आज जे काम करत आहे त्यापेक्षा मोठं काम देणे, मोठी जबाबदारी देणं म्हणजे त्या व्यक्तीवर विश्वास टाकणं होय, असा विश्वास टाकला की लोक आपोआप तो सार्थ करण्यासाठी प्राणाची बाजी लावतात. पुरंदरचे किल्लेदार असणाऱ्या नेताजींना महाराजांनी सरसेनापती केलं. पंचहजारी असणाऱ्या प्रतापरावांना सरसेनापती केलं. प्रतापरावाच्या बलिदानामुळेच अचानक रिक्त झालेली जागा खंबीरपणे चालवलेल्या हंसाजी मोहीतेना एक हजारीवरुन थेट सरसेनापतीपदाची जबाबदारी दिली ही सगळी उदाहरण जॉब इनरीचमेंट बाबतीत अत्यंत बोलकी आहेत.

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!