५१.किमतीपेक्षा मूल्य वाढवा : Price & Value

५१.किमतीपेक्षा मूल्य वाढवा : Price & Value

तुमच्या कष्टापेक्षा तुमची कलाकारी म्हणजेच तुमचे स्किल्स तुम्हाला मोठे यश मिळवून देत असते. आपण ज्या वस्तू खरेदी करतो त्याला एक फिक्स किंमत एमआरपी असते. तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला एक फिक्स पगार ठरलेला असतो. त्यालाच प्राईज किंवा किंमत म्हणतात आणि तुम्ही जर व्यवसायिक किंवा प्रोफेशनल असाल, जसे डॉक्टर, इंजिनियर, सीए, कलाकार असाल तर तुम्हाला तुमचे मूल्य म्हणजेच तुमची व्हॅल्यू मिळत असते आणि ते ठरविण्याचा अधिकार त्या व्यक्तींनाच असतो.
तुमची व्हॅल्यू ही तुमच्या कौशल्यावर, तुमच्या हुशारीवर अवलंबून असते. आपण पाहतो की दोन भाऊ, दोन कामगार, दोन सेल्समन यांचे शिक्षण,

त्यांचे सराउंडिंग सारखेच असले तरी त्यांना मिळणारा पैसा, मानसन्मान यामध्ये मात्र फार मोठा फरक असतो. असे का? तर त्यांची व्हॅल्यू ही वेगवेगळी असते. आपण पाहतो दोन वकील मित्र, त्यांची डिग्री सागबी असली, दोघांनी एकाच सिनियर कडे प्रशिक्षण घेतले असले तरी त्यांच्या उत्पन्नामध्ये प्रचंड मोठी तफावत असते. एक जण काही हजार कमवतो तर दुसरा लाखात, कोटीत पण कमवतो. तसेच दोन डॉक्टर, दोन कलाकार, दोन संगीतकार यांच्याही उत्पन्नात प्रचंड मोठा फरक असतो. दोन्ही संगीतकार सात सुरांचाच वापर करतात. परंतु एकाला काही हजारांचे काम मिळत नाही. तर दुसरा ए.आर. रेहमान सारखा एकाच पिक्चर साठी १० करोड रुपये घेतो. तरीही त्याला वेळ नसतो. फरक असतो तो त्यांच्या value चा. त्या दोघांची value ही वेगवेगळी असते म्हणून त्यांना मिळणारे आऊटपुटही वेगळेच असते.

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!