५१.किमतीपेक्षा मूल्य वाढवा : Price & Value
माझ्याकडे एक तरुण मुलगा आला आणि म्हणाला माझी कंपनी मला फक्त १५ हजार रुपये पगार देते. या महागाईच्या काळात त्यामध्ये भागत नाही. मी खूप सिन्सिअरली काम करतो. तरीही मालक माझा पगार वाढवित नाही. असे का? आता मी काय करू? मी त्याला म्हणालो, मालक पगार वाढवित नाही. मला वाटते हे अर्ध सत्य आहे. पूर्ण सत्य हे आहे की, मालक फक्त तुझा पगार वाढवित नाही. तुझ्याच कंपनीत कोणाला तरी ५० हजार, तर एखाद्याला एक लाख रुपये पगार ही असेल! हे खरे आहे का? तो म्हणाला, हो हे खरे आहे. ज्यांना तुझ्यापेक्षा जास्त पगार आहे तेही तुझ्या इतकेच ८ – १० तास काम करतात. त्याचे मुख्य कारण आहे, त्यांनी ज्यांची व्हॅल्यू वाढविलेली
आहे. म्हणून त्यांना जास्त पगार आहे.
खरे तर प्रत्येकाला त्याच्या स्किल्स, कॅलिबर म्हणजे कुवती प्रमाणेच पैसा आणि मानसन्मान मिळत असतो. हेच अंतिम सत्य असते. रस्त्यात आपली गाडी बंद पडली तर आपण जवळच्या फिटरला बोलवतो. तो फिटर बोनेट खोलून इंजिनचे निरीक्षण करतो आणि एखादा नटबोल्ट बदलून गाडी चालू करतो. पण त्यासाठी तो ५०० रुपये चार्ज करतो. आपण जर त्याला विचारले की, बाबा १० रुपयांच्या नटाचे तू ५०० रुपय कसे मागतो. तेव्हा तो फिटर म्हणतो, सर नटाची किंमत १० च रुपये आहे, पण फॉल्ट शोधण्याचे ४९० रुपये आहेत. म्हणजे १० रुपये ही प्राईस आहे आणि ४९० ही माझी व्हॅल्यू आहे.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
