५. Job Security : नोकरीची हमी
जगात या प्रेरणादायी घटकाचा किती उपयोग होत असतो ते नक्की सांगता येणार नाही. परंतु मराठी माणसाला मात्र “कायम नोकरी” या शब्दाचे खूप आकर्षण राहिलेले आहे. त्यामुळे उद्योग धंदा करणारी माणसं कमी आणि नोकरी शोधणारी जास्त आहेत. नोकरी मिळणे अलभ्य लाभ आणि Permenant नोकरी म्हणजे तर स्वर्गात गेल्यासारखंच आहे. नोकरीची शाश्वती म्हणजे मराठी माणसासाठी कल्पवृक्ष सापडणे, कामधेनु हाती लागणे आणि चिंतामणी रत्न सापडणे यासारखी आहे. या गोष्टीचा शिवाजी महाराजांनी बारकाईने उपयोग केलेला दिसतो.
महाराजांनी दरवर्षी मोठ्या प्रमाणात सैन्यभरती करण्याची प्रक्रिया वाढती ठेवली. अर्थात जेवढा राज्यविस्तार होत गेला तशी सैन्याची गरज वाढणं स्वाभाविक होते. परंतु महाराजांच्यावेळी किंवा त्यापूर्वी सगळेच राजे लोकांना ज्या नोकऱ्या द्यायचे त्या कंत्राटी स्वरुपाच्या किंवा हंगामी स्वरुपाच्या असायच्या. म्हणजे काय तर लढाईपुरती सैन्यभरती करायची आणि लढाई संपली की नोकरी संपली. महाराजांनी ही पद्धत बदलली आणि तैनाती फौज म्हणजे कायम स्वरुपी खडे सैन्य उभं केलं.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
