५१.किमतीपेक्षा मूल्य वाढवा : Price & Value
तुम्हाला तुमची व्हॅल्यू वाढवायची असेल तर छोट्या छोट्या दोन टेस्ट करा. पहिली टेस्ट आहे, तिला म्हणतात मम्मा टेस्ट. यामध्ये तुमच्याबद्दल,
तुम्ही करत असलेल्या कामाबद्दल तुमची आई प्राऊड फील करते का? म्हणजे तुमच्याबद्दल तिला अभिमान वाटतो का? जर नसेल वाटत तर तुम्हाला तुमच्या सवयी आणि दिशा बदलाव्या लागतील.
दुसरी टेस्ट आहे पप्पा टेस्ट. यामध्ये तुम्ही स्वतःला वडील समजा व तुमचा मुलगा तुमच्याबद्दल प्राऊड फील करतोय का नाही ते पहा. तुमच्याबद्दल अभिमान वाटत नसेल तर तुम्हाला असे कार्य करावे लागेल ज्यामुळे तुमच्या मुलाला तुमचा अभिमान वाटेल. त्यासाठी तुम्हाला तुमची व्हॅल्यू वाढवावी लागेल. व्हॅल्यू वाढवण्यासाठी Positive Attitude, Clear Vision आणि Positive Action केल्यास तुम्ही तुमची व्हॅल्यू काही पटीत वाढवू शकता. जर तुम्ही किमतीच्या मागे लागलात तर, लोक तुमची किंमत करतील. म्हणून यशस्वी लोक त्यांच्या किमतीपेक्षा मूल्याला जास्त महत्त्व देतात. म्हणून ते यशस्वी होतात. म्हणून तुम्ही आजपासून किमतीपेक्षा तुमचे मूल्य वाढवा आणि जीवनात यशस्वी व्हा.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
