५५.१००% लक्ष केंद्रित कसे करावे ? : Focus
एक महिला पूजेचे ताट घेऊन देवाला प्रदक्षिणा घालायची पण, मंदिरात इतर महिलांच्या गोंगाटामुळे तिचे लक्ष लागत नव्हते. त्यामुळे तिने
मंदिराच्या पुजाऱ्याकडे तक्रार केली. तेव्हा पुजारी म्हणाले, उद्या पूजेच्या ताटाबरोबर एक काचेचा ग्लास घेऊन ये. तो पाण्याने पूर्ण भरून, ग्लासमधील पाण्याचा एकही थेंब खाली पडू न देता, देवाची प्रदक्षिणा पूर्ण कर. महिलेने पाण्याचा एकही थेंब सांडू न देता प्रदक्षिणा पूर्ण केली. त्यावेळी पुजारी म्हणाले आज तुला महिलांच्या गोंगाट ऐकू आला का? तर ती म्हणाली नाही. कारण तिचा सर्व फोकस हा ग्लासमधील पाणी सांडून न देण्यावर होता. असा असतो फोकस.प्रत्येक सामान्य माणसामध्ये असामान्य बनण्याची क्षमता असते. फक्त त्यासाठी त्याला त्याच्या ध्येयावर १०० टक्के फोकस करता आला पाहिजे. तुम्ही कितीही ज्ञानी, हुशार असा, मेहनती, अनुभवी आणि मोटिवेटेड असा, पण जर तुमचा फोकस तुमच्या कामावर नसेल. तर तुम्हाला कदापि यश मिळणार नाही हा सिद्धांत सांगतो. फोकस म्हणजे एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे. आपले लक्ष विचलित होऊ न देणे.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
