९.Cordial Relations:
सर्वाचे सर्वाशी संबंध मधुर ठेवा. फक्त नेत्याचे कार्यकर्त्याशी नाही तर प्रत्येक कार्यकर्त्याचा सुपीरीअरशी आणि प्रत्येक सुपीरीअरचा प्रत्येक सहकाऱ्याशी चांगला संबंध असणे गरजचे. चांगले संबंध कशाला म्हणतात ते मुंग्याकडून शिका किंवा एखादी साखळी कशी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कडीला जर मजबुतीने जोडलेली असेल तरच ती मजबुत म्हणता येते. तसे संस्थेतील, संघटनेतील प्रत्येक व्यक्तीचे खालपासून वरपर्यंत एकमेकांशी खूप चांगला संवाद समजूत आणि मधूर संबंध असणे हा ही एक मोठा प्रेरणादायी घटक असतो.
स्वार शिपाई ते सेनापती सर्व लोक महाराजांसाठी जीव अर्पण करायला तयार असायचे. तसेच महाराजही सामान्य सैनिक आणि अधिकाऱ्यासाठी आपला जीव खर्ची पाडायला तयार असायचे आणि म्हणून मावळे म्हणायचे लाख मेले तरी चालतील परंतु लाखांचा पोशिंदा मरता कामा नये. सरदार म्हणायचे आधी लग्न कोंढाण्याचे मग रायबाचे. तसेच महाराजही म्हणायचे की सर्वात आधी कल्याण स्वराज्याचे त्यासाठी लढणाऱ्या मावळ्यांचे आणि नंतर राजाचे या अशा मधुर संबंधाच्या जीवावरच महाराज असे म्हणायचे की माझा एक एक किल्ला एक एक वर्ष लढेल आणि माझा शेवटचा मावळा जिवंत असेपर्यंत स्वराज्य टिकेल आणि ते खरं ठरलं.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
