प्रेरणेची मुलुखावेगळी उदाहरणे
छत्रपती शिवाजी महाराज वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या माध्यमातून मावळ्यांनाच नव्हे तर रयतेलाही प्रेरणादायी आव्हानात्मक कामे करण्यासाठी आवाहन करत असत. यात आर्थिक प्रेरणेबरोबरच इतर गोष्टी महाराज मावळे आणि रयतेला देऊ करत असत. अशाच एका मोटीवेशन प्रकारातला हा प्रसंग पाहूया.
शिवाजी महाराजांनी राजधानीसाठी रायगड किल्ल्याची निवड केली आणि राजधानीला शोभेल असा गड बांधायला सुरुवात केली. सर्व तटबंदी वगैरे बांधून झाल्यावर गडाची अभेद्यता पाहण्यासाठी महाराजांनी मोठी योजना जाहीर केली. राजधानीचा गड हा अजिंक्य आणि बेलाग असा बांधून झालेला आहे की नाही याची खात्री करुन घेण्यासाठीच महाराजांनी सर्वत्र दवंडी पिटवली आणि घोषणा केली की जो कोणी किल्ल्याचा महादरवाजा सोडून इतर मार्गाने वर येऊन किल्ल्यावर झेंडा फडकविल त्याला महाराज स्वहस्ते बक्षीस देणार. बक्षीस १०० होन रोख आणि सोन्याचं कडं आणि एक उमदा घोडा असं जाहीर केलं.
आता कामगिरी जेवढी मोठी बक्षिसही तेवढंच मोठं. महाराजांना कल्पना होती की रायगड चढणे म्हणजे मृत्यूच्या दाढेत जाण्याची ईच्छा असणारानेच ती हिंमत करावी. स्वराज्यात असे शीर तळहातावर घेऊन लढणारे, गड चढणारे हजारो मावळे आहेत यातीलच एखादा मावळा हे आव्हान स्विकारेल त्याच्या पराक्रमाचे चीज होईल आणि गडाची अभेद्यताही मोजता येईल. एखादा माणूस जर गडावर आला तरच गडाला माळा लावता येतात आणि एकदा का माळा लावल्या की रात्रीच्या अंधारात हजारो गनिम मग गड चढून वर येऊन किल्ला ताब्यात घेत असतो. म्हणून एकटा दुकटा कोणी गडावर येण्याची कोठून येण्याची तजवीज करतो ते महाराजांना पहायचे होते आणि रायगडाची अभेद्यता भेदणारी ती वाट, कडे तासून महाराजांना बिकट आणि निर्धोक करावयाची होती. एक प्रकारे गडाची परीक्षा आणि मावळ्यांची रयतेची परीक्षा एकाच प्रसंगातून महाराज आजमावणार होते.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
