प्रेरणेची मुलुखावेगळी उदाहरणे

प्रेरणेची मुलुखावेगळी उदाहरणे

आणि महाराजांचे हे दोन्ही हेतू साध्य करण्याचा प्रयत्न एका दलित तरुणाने मोठ्या धाडसाने पार पाडला. डोंबाऱ्याचा खेळ करणाऱ्या एका कुटुंबातील तरुणाने महाराजाचं हे आव्हान स्वीकारलं आणि तो धाडसी तरुण आपल्या कबिल्यासह, कुटुंबासह रायगडच्या पायथ्याला आला. त्याने एक संपूर्ण दिवसभर रायगडची सर्व
बाजूनी टेहखणी केली आणि मग एका अवघड परंतु इतर वाटापेक्षा सोप्या वाटणाऱ्या खडकाळ भागातून वर जाण्याचा निर्णय घेतला. अर्थात ही योजना शासकीय असल्यामुळे महाराज स्वतः रायगडावर थांबून या धाडसी तरुणाच्या प्रयत्नाला बळ देणार होते आणि मध्येच या तरुणाला काही मदत वगैरे लागली तर मोठ-मोठाले दोरखंड आणि जाळ्या ऐलान माहले मंडळी किल्ल्याच्या पायथ्याला आणि तटबंदीवरही सज्जपणे उभे राहिली.

या धाडसी तरुणाने आपला जीवघेणा रायगड चढाईचा प्रवास सुरु केला आणि महाराजांनी गडाखाली आणि गडावरही ढोल ताशे नगारे वाजवायला सांगितले. महाराजांना या प्रसंगाचा फक्त आनंद झाला होता असे नसुन महाराजांना आपल्या स्वराज्यात असे धाडसी जेवढे म्हणून लोक असतील त्यांना प्रोत्साहन द्यायची नेहमी भूमिका असायची. म्हणून महाराजांनी त्या तरुणाचे धैर्य वाढावे त्याची हिंमत कायम रहावी म्हणून है प्रोत्साहन देण्याची व्यवस्था केली.

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!