इंडस्ट्रीएल सेफ्टी आणि झिरो वेस्टेज

इंडस्ट्रीएल सेफ्टी आणि झिरो वेस्टेज

आज मोठे-मोठे धंदे उभे करताना व्यवस्थापक मंडळीना ज्या दोन मुलभूत गोष्टीकडे पहावे लागते त्या म्हणजे इंडस्ट्रीयल सेफ्टी आणि झिरो वेस्टेज. औद्योगिक सुरक्षा म्हणजे काय तर आग आणि पाणी यापासून उद्योगाचं रक्षण करण्याची तजवीज करणे आणि झिरो वेस्टेज म्हणजे काय तर नुकसानच होऊ नये याची शंभर टक्के काळजी घेऊन तशी योजना राबविणे. या दोन्ही बाबतीत राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान टाळण्यासाठी आणि औद्योगिक सुरक्षा कायम ठेवण्यासंदर्भातील महाराजांचे एक अस्सल पत्र उपलब्ध आहे. मी येथे वाचकांना शिवाजी महाराजांचे व्हिजन किती मोठे होते हे लक्षात येण्यासाठी देत आहे. सर्वस्पर्शी असे हे पत्र म्हणजे व्यवस्थापकाला महाराजांनी दिलेली मार्गदर्शक तत्वे असून कर्मचाऱ्यासाठी ती तंबी देखील आहे. आणि ही औद्योगिक सुरक्षा बाळगली नाही तर त्याची झळ सर्वसामान्य जनतेला कशी बसू शकते याचेही स्पष्टीकरण या पत्रात आहे. काय करावे आणि काय टाळावे याचेही मार्गदर्शन यात आहे. ही सुरक्षिततेची काळजी घेताना माणसं, जनावर ते राष्ट्राची निसर्ग संपत्ती या सर्व गोष्टींवर चौफेर लक्ष ठेवून त्या हेतूने महाराजांचे हे पत्र आहे. पर्यायाने ते फक्त उद्योगाचं संरक्षण इतपर मर्यादीत नसून पर्यावरण संरक्षणाची सुद्धा संबंधीत आहे.

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!