इंडस्ट्रीएल सेफ्टी आणि झिरो वेस्टेज

इंडस्ट्रीएल सेफ्टी आणि झिरो वेस्टेज

९ मे १६७४ चा प्रसंग आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत. चिपळूण येथे शिवरायांच्या सैन्याची छावणी पडली होती. दाभोळच्या सुभ्यात पावसाळ्याची बेगमी म्हणून सारी सामग्री, धान्य आणि इतर आवश्यक गोष्टी गोष्टींचा साठा केलेला होता. परंतु त्यांपैकी बराचसा भाग अगोदर संपला. त्यामुळे सैनिकांकडून छोट्या छोट्या उपयोगी जिनसांसाठी चिपळूणच्या आजूबाजूच्या प्रदेशातील रयतेला थोडा त्रास सुरू झाला. शिवरायांच्या हे कानावर येताच त्यांनी आपल्या लष्करी अधिकाऱ्यांना पत्र लिहून ताकीद दिली. त्या पत्राचा काही अंश पुढे दिला आहे.

याउपरी, तुम्ही मनात येईल त्सा दाणा, रोजचा खुराक, गवत् मागाल, असेल तोपर्यत धुंदी क्रून् कशाची पर्वा न करता चाराल आणि सर्व सामग्री नाहीशी झाली, म्हणजे मग काही पडत्या पावसात मिळणार नाही. उपास पडतील, घोडी मराव्यास
लागतील. याचा अर्थ घोडी तुम्हीच मारली असा होईल आणि लागली तणीसाठी आजुबाजूच्या प्रदेशाला लामा तेल लागाल. जाले झाले म्हणजे सैन्यातले लोक गावात जातील, कोणी असे याचे बेधील दाणे, कोणी भाकर, कोणी गवत, कोणी लाकूडफाटे, कोणी भाजी, कोणी पाले इत्यादी ऐवज घेऊन बलि आणि असा त्रास कुणबी लोकांना होऊ लागला, म्हणजे जे काही कुणबी घर धरून आहेत ते केवळ उपाशी मरू लागतील म्हणजे त्या लोकांना असे वाटू लागेल की मोगलांच्या धाडीपेक्षा तुमची धाड अधिक झाली. असा लोकांचा तळतळाट होईल. तेव्हा रयतेचे व घोड्यांचे जे नुकसान होईल त्याची सारी बदनामी तुम्हावरी येईल. हे तुम्ही बरे जाणून, सिपाही (घोडेस्वार) असो अथवा पावखलक (पायदळातील लोक) असोत अत्यंत सावधगिरीने वर्तन करावे. जे कोणी सैनिक लोक बागेत अथवा या प्रदेशात गावोगाव राहिले असतील त्यांना येथील रयतेला काडीचाही त्रास देण्याची गरज नाही. जेथे तुम्ही राहिला आहात तेथून् बाहेर पडाव्यास तुम्हास् गरज नाही. साहेबांच्या खजिन्यातून प्रत्येकाच्या पदरी वाटणी घातली आहे. तेव्हा अशा परिस्थितीत ज्याला जे हवे असतील ते म्हणजे दाणा, अगर ज्यांच्याजवळ गुरेढोरे असतील त्यांना गवत् हवे असेल, अगर लाकुडाफाटा हवा असेल, अथवा भाजीपाले आणि इतर व्रक्ड जिन्नस् हवे असतील त्याने बाजारात जावे आणि तेथे जे विकावयास येइल ते रास्त भावाने विकत आणावे. कोणावर जुलूम् जब्रदस्ती क्रू न्ये, भांडणतंटा करु नये, पोटासाठी जी सामग्री साठविली आहे, ती सारा पावसाळा पुरविली पाहिजे, अशा पद्धतीने कारकून् मंडळी दाण्याच्या रोजचा खुराक देतील त्याचप्रमाणे घेत जावे. असे झाले म्हणजे उपाम् पडणार नाहीत. आणि दररोज खवयास मिळत् जाईल आणि असे करीत असताना घोडी ताजीतवानी, सशक्त होईल असे करावे. कारकुनाशी सैनिकांनी नुसतीस धसफर क्रू न्ये, आपल्याला आमुकच छा, तमुकच या अशी मागणी करीत पुंडाईने मोतहाराने अथवा नोकराने कोठीत, कोगरात् शिरून् लुटालूट करू नये. हल्ली उन्हाळ्याचे दिवस आहेत. पागेचे लोक तेथे जागा धरून् राहिले असतील किंवा राहतील. या लोकांपैकी कोणी आगट्या पेटवतील, कोणी भलत्याच जागी चुली मांडतील, अল शिजविण्यासाठी चरी खणतील, कोणी तंबाखू पेटविण्यासाठी आगी घेतील. या वेळी बाजूला गवत् पडले आहेत याचा विचार ते करणार नाहीत. वारा लागेल आणि नकळत् एकाएकी आग लागेल व काही दगाफटका होईल असे त्यांच्या मनातही येणार नाही. एका खणास अथवा जागेस आग लागली म्हणजे तिचा फैलाव होऊन् सारे खण जळून जातील. गवताच्या राशीत् अधवा बडमीत कोणीकडून् जी विस्तव जाऊन् पडला, सारे गवत् आणि जितके म्हणून् गवताचे ढीग असतील ते एकामागून् एक जळू लागतील. तेव्हा तुम्ही कुणब्यांच्या गर्दना मारल्या असे होईल आणि कारकुनाम कितीही ताकीद दिली तरी काही अण बांधण्यास लाकूडफाटा मिळणार नाही. एक खणसुद्धा बांधता येणार नाही हे तुम्हा सर्वांना माहित् आहे.”

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!