इंडस्ट्रीएल सेफ्टी आणि झिरो वेस्टेज

इंडस्ट्रीएल सेफ्टी आणि झिरो वेस्टेज

रात्रीच्या वेळी छावणीवर घ्यावयाच्या काळजीबद्दल महाराज पुढील सूचना करतात, “तेव्हा वरील कारणास्तव सर्वांना बरी ताकीद द्यावी, आणि तुम्ही स्वतः सर्व अधिकाऱ्यांनी अथवा कोणाच्या घरी रात्री दिवा जळत आहे. आणि अविस्त्राच (अचानक) एखादा उंदीर येऊन् पेटती वात् पळवून नेईल अशा गोष्टी होणार नाहीत याची खबरदारी द्यावी. आगीमुळे दगा फटका होणार नाही, आणि खण आणि गवत वाचेल ते करावे. म्हणजे पावसाळ्यात घोडी बांधावी लागणार नाहीत. त्यांना खावयास घालावे लागणार नाही. कारण सगळी पागाच नष्ट झालेली असेल
आणि तुम्ही निष्काळजी राहिलात अमा तुमच्यावर उपका आणि या कारणासाठी येवढ्या तपशीलवार तुम्हास पत्र लिहिले आहे. छावणीत जितके म्हणून खास खास जुमलेदार, हवालदार, कारकून् हजर असतील त्यांनी या आज्ञापत्रातील तपशील काळजीपूर्वक ऐकणे, आणि सर्वांनी हुशार राहणे. वरचेवर रोजच्या रोज खबर घेऊन्, लोकांना ताकीद क्रू या आज्ञांप्रमाणे ज्यांच्या हातून वर्तन् घडणार नाही, त्यांत अंतर पडेल, ज्याच्या हातून गुन्हा घडेल, आणि असे झाले म्हणजे मग रोजगार तरी कोठून मिळणार? अशा प्रकारचे गैरवर्तन करणांच्या दुर्जन् समजले जाईल, आणि त्यांना शिक्षा केल्याशिवाय सोडले जाणार नाही, हे सर्व ठिक जाणून् सर्वानी वर्तणूक कावी.

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!