सुशिक्षित शिवाजी महाराज

सुशिक्षित शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचे मुळातून विपर्यास करणारा पहिला माणूस महणजे ग्रेट उफ. आणि याच ग्रँट डफच्या चुकीच्या माहितीवर इतिहासाची विकृत इमारतीवर कळस लावण्याचे काम जदुनाथ सरकार यांनी केले. त्यातील एक नमुना म्हणजे ग्रँट डफ याने शिवाजी महाराजांना अंगठेबहाद्दर म्हणण्यापर्यंत मजल मारतुना कोणीही यावे आणि टपली मारावे अशी मराठ्यांच्या इतिहासाची दुर्दशा या ग्रँट डफने केली. महाराजांबद्दल तो काय म्हणतो, “लिहिता वाचता येणारे मराठे विरळेच असतात. अशाप्रकारचे सर्व शिक्षण हे कारकुनाचे काम आहे आणि अप्रतिष्ठा आणणारे नसले तरी निदान आपल्याला शोभणारे नाही असे ते (मराठे) मानतात. शिवाजीला स्वतःचे नाव कधीही लिहिता आले नाही. परंतु तो चांगला तिरअंदाज व नेमबाज होता आणि भाल्याचा व दख्खनमध्ये प्रचलित असलेल्या निरनिराळ्या प्रकारच्या तलवारींचा व खंजीरांचा वापर करण्यात कुशल होता.” (ग्रँट डफ खंड १, पान न. ९४)

जदुनाथ सरकार शिवाजी महाराजांबद्दल लिहितात, “मध्ययुगीन भारतातील अकबर, हैदरअली आणि रंजीतसिंह या पुरुषांप्रमाणेच शिवाजी देखील निरक्षर होता असाच पुराव्याचा कल आहे. शिवाजीला जे अनेक युरोपीय भेटले त्यांनी त्याला काही लिहिताना कधीच पाहिले नाही. जेव्हा त्यांनी राजांकडे काही अर्ज सादर केला तेव्हा त्यांनी तो वाचून दाखविण्यासाठी त्यांच्या अधिकाऱ्याकडे दिला. शिवाजीच्या हस्ताक्षरातला कोणताही मजकूर उपलब्ध असल्याचे ज्ञात नाही. (शिवाजी अॅण्ड हिज टाइम्स पान नं. २५)

एवढेच म्हणून जदुनाथ सरकार थांबलेले नाही तर त्यांनी पुन्हा पुन्हा शिवाजी महाराज निरक्षर असल्याचे म्हटले आहे. आता जदुनाथ सरकार आणि ग्रँट डफ हे इतिहासात कशी हरामखोरी करतात याची जरा पोट फाडून चिकित्सा करावी लागेल.

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!