६०.विक्री कलेचे विज्ञान : Sales

६०.विक्री कलेचे विज्ञान : Sales

३) सेल्समनने विक्री करण्या अगोदर आपल्या ग्राहकाचा सल्लागार व्हावे तरच विक्री होईल. ग्राहकाला त्याच्या फायद्याचा सल्ला द्यावा. गरज नसताना आपल्या फायद्यासाठी वस्तू किंवा सेवा त्याच्या माथी मारू नये. नसता संबंध खराब होतील आणि आपली बदनामी होईल. त्यामुळे व्यवसायाची वाढ होणार नाही. Win Win situation नेच चांगली विक्री होते. सेल्समनने एखाद्या चांगल्या कन्सल्टंट डॉक्टर सारखे व्हावे. चांगला डॉक्टर नेहमी सर्वप्रथम पेशंटला तपासतो. म्हणजेच Examine करतो. म्हणजे सर्व माहिती घेतो. त्यानंतर Daignosis करतो. म्हणजे वेगवेगळ्या टेस्ट करतो. जसे एक्स-रे, रक्त, लघवीची टेस्ट करतो. त्यानंतर पेशंटला विश्वासात घेऊन सर्वात शेवटी ट्रीटमेंट अर्थात ऑपरेशन करतो. त्यामुळे
पेशंट समाधानी राहतो आणि डॉक्टरची माऊथ पब्लिसिटी करतो, याऊलट दुसरा एखादा अति हुशार डॉक्टर असतो. तो पेशंटला तपासतो आणि म्हणतो, तुम्हाला अपेंडिक्स झाले आहे. ऑपरेशन करावे लागेल, झोपा, मी ऑपरेशन करतो, अशावेळी पेशंट ऑपरेशन तर करणारच नाही. पण पळून जाईल आणि डॉक्टरांची बदनामी करेल. कारण या हुशार डॉक्टरांनी Examine, Daignosis न करता डायरेक्ट ट्रीटमेंट म्हणजे ऑपरेशन करण्याचा प्रयत्न केला. म्हणून हा डॉक्टर फेल झाला. चांगला सेल्समन असतो तो डायरेक्ट सेल न करता, आपल्या ग्राहकाचा सल्लागार बनतो, तोच सेल्समन तुफान यशस्वी होतो.

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!