सुशिक्षित शिवाजी महाराज
इ.स. १६६१ मध्ये शिवाजी महाराजांनी इंग्रजांची राजापूर वखार उद्वस्त केली. कारण आपल्या सगळ्यांना माहित असेलच. महाराज पन्हाळ्यामध्ये अडकल्याचे पाहून इंग्रजांनी पन्हाळ्यावर तोफा डागल्या होत्या. वखारीची झालेली नुकसान भरपाई मागण्यासाठी इंग्रजांनी १ ऑक्टोंबर १६७३ रोजी जॉन चाईल्ड याच्या घरी महाराजांचा वकील भिमाजी पंडीत याच्याशी बोलणी केली. तिथे जो युक्तीवाद झाला त्याबाबत इंग्रज काय म्हणतात ते पहा,
“या सर्वावर आम्ही उत्तर दिले की जरी त्याच्या धन्याला ४ हजार पॅगोड्याहून अधिक काही मिळाले नाही असा युक्तीवाद त्याने केला असला आणि या प्रकरणी प्रेसीडेंट व कौन्सील यांनी शिवाजीकडे नेमलेला नारायण शेणवी याला जिच्यात (लुटीचा) तपशील नोंदवला होता अशी एक जुनी वही स्वतः शिवाजी राजांनी दाखविली होती म्हणून तो (भिमाजी) नारायण शेणवी याची साक्ष त्याला (महाराजांना) अधिक काही मिळाले नव्हते असे आम्हाला पटवून देण्याकरता काढीत असला आणि जरी हे (म्हणजे शिवाजी महाराजांना राजापूरच्या वखारीतून ४ हजाराहून पॅगोड्याहून अधिक किंमतीची मालमत्ता मिळाली नव्हती हे) खरे आहे असे मान्य केले तरी शिवाजी राजांनी न्यायाच्या दृष्टीने आम्हाला पुर्ण नुकसान भरपाई देण्यास हवी कारण त्यांनी राजापूर लुटले नसते तर कंपनीचे हे नुकसान कधीच झाले नसते.
तो मुळ उल्लेख इंग्रजीत अशाप्रकारे आहे.
“To all which we answered that although he pleaded his master received no more than about 4000 pagodhas and brings noransimy, who was employed in this affair by the president and council to sevagee, as a witness to
persuade us that he received no more, sevagee rajah himself showing Noransimay an old book wherein the particulars were mentioned, which although granted to be true, yet Sevagee Rajah ought in justice to make a full satisfaction for had not he robbed rajapure the company had never sustained the lost.”
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
