६२.यशाचा १००० बाय १००० मंत्र
बाळ जन्माला येते तेव्हा ते खूपच नाजूक असते, त्याला तळहाताच्या बाफोडाप्रमाणे जपावे लागते. ते छोट्या छोट्या व्हायरसने लगा आजारी पडते. त्याला सर्दी, खोकला, थंडी ताप असे आजार नेहमी येतात. कारण त्याची प्रतिकारशक्ती कमी असते. म्हणूनच जन्मलेल्या बाळाला १००० दिवस खूपच जपावे लागते. त्यानंतर ते बाळ १००० महिने अर्थात ८४ वर्ष
बिनधास्त जगू शकते.
हाच नियम कोणत्याही उद्योग व्यवसायाला लागू असतो. व्यवसाय सुरू केल्यानंतर पहिले १००० दिवस म्हणजे तीन वर्षे, आपल्या व्यवसायाची खूपच काळजी घ्यावी लागते. त्यासाठी तुम्हाला तन, मन, धन, सर्वस्व द्यावे लागते, सुरुवातीला तुम्हाला इनपुट जास्त द्यावे लागते व आउटपुट कमी येत असते, म्हणून त्यासाठी १०० दिवसांचे १० टप्पे करा. प्रत्येक टप्प्यावर व्यवसायात आधीपेक्षा जास्त प्रगती झालीच पाहिजे. त्यासाठी बारीक नियोजन करून हे दहा टप्पे पूर्ण केले की पुढे १००० महिने म्हणजे ८४ वर्षेच काय पण शंभर वर्षापर्यंत व्यवसाय तेजीत चालू शकतो.
म्हणूनच तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या पहिल्या १००० दिवसांत चाहे जो कीमत अदा करना पडे! वह कीमत आप अदा करो! और अपने बिजनेस मे सफलता पावो.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
