महाराजांची संदेशवहन क्षेत्रातील क्रांती
महाराजांनी प्रकाशाचा उपयोग संदेश वहनासाठी केल्याचा दुसरा प्रयोग म्हणजे कोंढाणा किल्याची लढाई. कोंढाणा किल्ला ताब्यात घेण्यासाठी निवडक मावळयासह तानाजी मालुसरे राजगडावरुन महाराजांचा आणि जिजाऊ साहेबांचा आशिर्वाद घेवुन निघाला. कोंढाणा किल्ल्यावर जाऊन तानाजीने आपल्या पराक्रमाची शर्थ केली. तानाजी पडल्यानंतर सुर्याजी मालुसरे, सुर्याजी जेधे, आणि शेलार मामाने उदय भानाच्या नरडीचा घोट घेत कोंढाणा जिंकला. कोढाणा जिंकला ती वेळ होती मध्यरात्रीची आणि अशा वेळी कोंढाणा जिंकल्याची खबर देण्यासाठी महाराजांनी इशारत करण्यासाठी जी खुण ठेवली होती ती होती प्रकाशाची. राजगड आणि कोंढाणा नजरेच्या टप्प्यात होता. कोंढाणा घेईपर्यंत रात्रभर महाराज कोंढाण्याच्या बाजुकडील बुरुजावरुन इशाऱ्याची वाट पाहत होते सोबत जिजाऊ साहेब आणि शंभू राजेही होते. कोंढाणा जिंकला की इशारत म्हणुन गडावरील गवताच्या गंजी पेटविण्याचे ठरले होते. त्यानुसार मावळ्यांनी कोंढाणा जिंकताच गडावरील गवताच्या गंजी पेटवुन राजगडावर असणाऱ्या महाराजांना तसा संदेश दिला.
अर्थात रात्रीच्या वेळी लोकांची झोपमोड होऊ नये म्हणुनही कदाचित महाराजांनी तोफाच्या इशारती ठेवल्या नसाव्यात किंवा रात्रीची लढाई सुरु झाली म्हणुन रयतेची धावपळ होवु नये म्हणुन महाराजांनी तोफांची इशारत जाणिवपुर्वक टाळली असावी. त्यामुळे कोणत्या प्रसंगी कोणती संदेश वहन यंत्रणा वापरावी याचे प्रचंड प्रसंगावधान आणि भान शिवाजी महाराज ठेवत असत हे लक्षात येते. ध्वनीचा आणि प्रकाशाचा उपयोग विज्ञानाची पहाटही झाली नव्हती तेंव्हा संदेश वहनासाठी उपयोग करणारा खऱ्या अर्थाने संदेशवहन क्षेत्रात क्रांती करणारा जाणता शिवाजी राजा आम्ही कधी ओळखलाच नाही.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
