४. एक राजा- एक उद्योजक म्हणून
२. प्रॉडक्ट-वस्तू – येतील- जातील परंतु तरीही कंपनी चालली पाहिजे,
दूरदृष्टीचा आणखी एक अर्थ आहे तो हा आहे की आपण अशी एखादी सेवा चा किंवा एखादी वस्तू तयार करा की जी लोकांना कायम कामाला आली पाहिजे. आणि काळाच्या ओघात ती सेवा किंवा वस्तू याचे उत्पादन बंद पडले किंवा सेवा विस्कळीत जरी झाली तरी कंपनी अव्याहतपणे चालूच राहिली पाहिजे. एखाद्या वस्तूमुळे किंवा सेवेमुळे कंपनी उदयाला तर आली पाहिजे पण तीच कंपनी त्या उत्पादनाअभावी किंवा सेवा खंडीत झाल्यामुळे देखील बंद पडली नाही पाहिजे.
याचा दुसरा अर्थ असा आहे की काळाप्रमाणे आपली वस्तू आणि सेवा प्रगत update करत चला. एकाच गोष्टीवर किंवा एकाच सेवेवर सदैव अवलंबून राहता कामा नये.
स्वराज्य निर्मिती करताना महाराजांनी लोकांना बी-बियाणे आणि शेतीसाठी लागणारी अवजारे दिली, त्यातून शेतीला उभारी मिळाली. परंतु पुढे जेव्हा औरंगजेब स्वतः महाराष्ट्रावर चालून आला तेव्हा मात्र ही शेती आणि त्यावरील अवलंबून असलेली सेवाकार्ये बंद पडली. मग काय स्वराज्य कंगाल झाले का? शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या तत्त्वानुसार मग मराठ्यांनी काळानुसार आपली रणनिती बदलली. आपण शेती पिकवायची आणि शत्रूच्या फौजेने ती नासवायची यापेक्षा शेतीच न केलेली बरी आणि tu त्यापेक्षा मोगलांनी पार उत्तरेतून आणलेली रसद मारून खाल्ली तर काय वाईट. मग मराठ्यांनी तशीच सेवा सुरू केली. तुम्ही मोगलांनी तुम्हाला खाण्यासाठी रसद आणा आम्हीच ती लुटतो आणि खातो असा कार्यक्रम २७ वर्षे चालला.
स्वराज्य बुडाले नाही उलट वाढतच गेले. या २७ वर्षांत मराठ्यांनी शेती हा धंदाच सोडून दिला पण स्वराज्य मात्र टिकविले. याला म्हणतात दूरदृष्टी. रणनिती बदलली पण ध्येय मात्र कोणत्याही परिस्थितीत बदलले नाही.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
