४. एक राजा- एक उद्योजक म्हणून

४. एक राजा- एक उद्योजक म्हणून

३. कंपनीने लोकांच्या आयुष्यावर काही परिणाम केला पाहिजे.

याला म्हणतात कंपनी is worthy worthy of existing. म्हणजे तुमची कंपनीच जर जन्माला आली नाही तर लोकांच्या आयुष्यावर असा काय फरक पडला असता याचा विचार करणे म्हणजेच काय तर आपली कंपनी ही लोकांच्या आयुष्याला दिशा देणारी त्यांचे आयुष्य घडविणारी, त्यांच्या आयुष्यात क्रांती करणारी ठरली पाहिजे. तर ती कंपनी निर्माण करण्यात काही अर्थ आहे अन्यथा नाही.

आज आपल्या आयुष्यात मोबाईल आणि टि.व्ही, संगणक यांची किती गरज आहे. यापूर्वी आपले जीवन एवढे सुखकर आणि वेगवान होते का? मग ही क्रांती करणाऱ्या कंपनी लोकांच्या आयुष्यावर प्रभाव तर पाडणारच ना ! तीच परिस्थिती ४०० वर्षांपूर्वी महाराष्ट्राची होती ना. परकीयांची गुलामी आणि अन्यायात जगणारी सगळी रयत आणि वतनदार होते. महाराजांनी स्वराज्य नावाची संकल्पना मांडली. लोकांना स्वाभिमान दिला. अन्यायाविरूद्ध लढण्याची प्रेरणा दिली. स्वराज्याच्या विकासासाठी सर्वांना उद्योजक बनविले, लाखो हातांना काम दिले आणि स्वतंत्र सार्वभौम राज्याची निर्मिती केली. म्हणजेच काय तर स्वराज्य पूर्व काळ आणि स्वराज्यकाळ आणि त्यानंतरचा स्वराज्य समाप्ती नंतरचा काळ यातील फरक लोकांना कळतो ना ! जेवढी सामाजिक एकात्मता महाराजांच्या काळी झाली तेवढी कधी पूर्वी आणि नंतर झाली नाही. रयतेने सोन्याचे दिवस ना अगोदर पाहिले होते ना नंतर. रयतेने असे स्वातंत्र्य ना अगोदर भोगले होते ना नंतर ते उपभोगायला मिळाले. हाच तो फरक स्पष्ट करतो की लोकांना स्वराज्याची नितांत गरज होती आणि ती गरज पूर्ण करतानाच महाराजांनी क्रांती करत या लोकांच्या आयुष्यात क्रांतीकारक बदल केले. ज्यांच्या हाती काठी, खुरपे, नांगर होता अशा सर्व जातींच्या लोकांना स्वराज्य निर्मितीसाठी आणि रक्षणासाठी क्षत्रिय केले. शिकण्याचा, जगण्याचा हक्क दिला आणि स्वराज्य राखण्यासाठीची जबाबदारीही त्यांच्याच अंगावर दिली.
हे राज्य माझ्याही मालकीचे आहे आणि ते रक्षण करण्याची माझी देखील जबाबदारी आहे ही केवढी मोठी मानसिकता लोकांच्या ठिकाणी निर्माण करता आली. आणि मला जर स्वातंत्र्य हवे, समता हवी, बंधुत्व हवे, प्रगती हवी, शांती हवी तर मग स्वराज्यासाठी लढले पाहिजे आणि प्रसंग आला तर मरले देखील पाहिजे ही. जागृतीची भावना लोकांना आपलीशी करता आली. जर मला माझं आणि माझ्या कुटुंबाचं, देशाचं भवितव्य घडवायचं असेल तर मला काय करायला पाहिजे हे लोकांना कंळून आलं आणि मग क्रांती झाली. हे सर्व होतं ते लोकांना देखील vision दूरदृष्टी दिल्यामुळे आणि महाराजांनी तेच काम केलं म्हणूनच स्वराज्य रयतेसाठी worthy of existing बनले. स्वराज्य ही रयतेची गरज होती आणि स्वराज्याला रयतेची गरज होती.

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!