४. एक राजा- एक उद्योजक म्हणून

४. एक राजा- एक उद्योजक म्हणून

७. मार्गदर्शक Coach

राजे तुम्हाला एक अत्यंत यशस्वी राजा व्हायचे असेल तर तुम्हाला एका गुरूची मार्गदर्शकाची नियुक्ती ही करावीच लागेल. जे आपणाला माहिता आहे ते माहित आहेच परंतु यापेक्षा आणखी वेगळे नवे आणि उत्तम असे जगात जे जे आहे आणि ते ज्याला ज्याला माहित आहे त्याला त्याला आपला गुरू करा, मार्गदर्शक करा. अत्यंत अवघड प्रसंगी जेव्हा आपण गोंधळू शकतो. आपली बुद्धी भ्रमीत होऊ शकते, आपला निर्णय चुकू शकतो अशा सर्व प्रसंगी आपण त्या त्या क्षेत्रातील अनुभवी आणि तज्ञ माणसावा सल्ला हा घेतला पाहिजे.

चुका करत करत शिकायला गेलात तर आपल्या अनेक चुका तर होतील परंतु त्यात खूप वेळही जाईल आणि आपणाला याची खूप मोठी किंमतही मोजावी लागेल. राजे गुरू शिवाय ज्ञान नाही, ज्ञानाशिवाय आत्मप्राप्ती

किंवा ध्येयप्राप्ती हे सुद्धा नाही. श्रीरामांनाही गुरू होते. श्रीकृष्णालाही गुरू होते म्हणूनच ते जगातील अत्यतं यशस्वी चारित्र्यवान आणि प्रसिद्ध असे राजे झाले. तुम्ही या दोघांच्या चरित्राचा अभ्यास करून रामकृष्ण यांच्यापेक्षा सरस असा इतिहास निर्माण करायला पाहिजे. आपल्या पूर्वजांपेक्षा दोन पाऊले पढे जाणे आणि त्यांच्यापेक्षा काकणभर तरी श्रेष्ठ असा पराक्रम करणे हे तुमची जबाबदारीच आहे. कारण तुम्ही माझ्या बाजूने श्रीकृष्णाचे वंशज आहात तर वडिलांच्या बाजूने श्रीरामाचे.

मी तुम्हाला राम आणि कृष्ण या दोघांचेही चरित्र अत्यंत उत्तम पद्धतीने गोट आणि कारणमिमांसा ते सिद्धांत अशी शिकवली आहेतच. तुमच्या बालपणी गोमाजी नाईक पानसंबळ यांनी आणि तुमच्या वडिलांनी तुम्हाला शस्त्रविद्या शिकविली आहे. आता पुढे कान्होजी राजे आणि इतर लोक मदत करतीलच. आणि तुम्हाला नितीशास्त्र आणि राजधर्म युद्धनिती शिकवायला मी साबलीप्रमाणे सदैव तुमच्या सोबत आहेच की. याशिवाय जगात जेथे जेथे तुम्हाला जो कोणी योग्य अधिकारी मनुष्य वाटेल त्यालाही गुरू करायला उपकारातून उतराई होण्याचा प्रयत्न जरूर करावा. विद्वान लोकांसमोर, त्यागी आणि तपस्वी लोकांसमोर कायम नम्रता धारण करावी. जो आपल्याला विद्याधन देतो त्याला मान आणि धन द्यायला कधी मागे पुढे पाहू नका. कमी जास्त करू नका. मोठ्या अंतःकरणाने मोठी बिदागी आणि मार्गदर्शन फी देत चला, मार्गदर्शकाला जात धर्म आणि पंथ नसतो हेही लक्षात ठेवा. ज्ञानी

हरकत नाही. परंतु हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की गुरू कधी राजा होत नसतो आणि राजानेही कधी गुरू होण्याच्या भानगडीत पडायचे नसते. ज्याचे काम त्याने करायचे असते. आणि जो कोणी आपणाला योग्य मार्गदर्शन करेल, प्रसंगी संकटात मदत करेल अशा प्रत्येक व्यक्तीच्या

माणसांकडून ज्ञान ग्रहण करणे, त्याचा अनुभव आपल्या पाठिशी घेणे आणि अचूक निर्णय घेत जास्तीत जास्त यश मिळविणे हेच ध्येय तुम्ही ठेवले पाहिजे. राज्य निर्माण करणे हाच तुमचा ध्यास आणि रयत पालन हाच तुमचा धर्म असणार आहे. तेव्हा सतत आपल्या कामावर फोकस करून काम करत
राहणे हाही एक वेगाने पुढे जाण्याचा मार्ग आहे. बाकी तुम्हाला छत्रपती करून तुमचा राज्याभिषेक केल्याशिवाय मी हा देह सोडत नाही हे पक्के समजून घ्या. तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचविल्याशिवाय मी निजधामाला जाणार नाही हे नक्की, ध्येयवादी माणसाला त्याचा मृत्यूसुद्धा त्याचे ध्येय प्राप्त होईपर्यंत गाठू शकत नाही हे मी पुन्हा एकदा सिद्ध करीन.

याउपरी जर कोणाला मार्गदर्शक म्हणून नेमायची गरज पडली तर त्या मार्गदर्शकामध्ये ज्ञान, अनुभव, निष्ठा, त्याग याचबरोबर तुमचं या स्वराज्याच कल्याण करण्याची, रयतेचं भलं करण्याची तीव्र प्रामाणिक इच्छा असलीच पाहिजे.

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!