७२.पैशाचे व्यवस्थापन
Money management
५) उत्पन्नाचे व खर्चाचे ट्रॅक रेकॉर्ड ठेवा-
जे लोक उत्पन्नाचा आणि खर्चाचा हिशोब ठेवत नाहीत, ते श्रीमंत तर सोडा पण गरीब झाल्याशिवाय राहत नाहीत. उत्पन्न आणि खर्चाची डायरी लिहिण्याच्या सवयीनेच माझा खूप फायदा झाला. आता तर तुमच्या उत्पन्नाच्या खर्चाचे ट्रॅक रेकॉर्ड ठेवण्यासाठी वेगवेगळ्या कंपन्यांचे अॅप आलेले आहेत. मोबाईल मधून Monefy नावाचे अॅप डाऊनलोड करा. यापुढे हवा भरण्यासाठी ५ रुपये
जरी खर्च केले, तरी त्याची नोंद ठेवण्याची सवय लावा. प्रत्येक महिन्याला सिंहावलोकन करून तुमचा अनावश्यक खर्च टाळा. त्यामुळे तुमची बचत आणि गुंतवणूक वाढेल. त्याबरोबरच तुमच्या उत्पन्नाबरोबर नफाही वर्षा गणिक २० टक्क्यांनी वाढलाच पाहिजे. हाही मनी मॅनेजमेंटचा नियम समजून घ्या.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v
