७२.पैशाचे व्यवस्थापन
Money management
७) कमावलेल्या पैशाचे योग्य नियोजन करा-
जगातले ९० टक्के लोक हे पैशासाठी काम करतात. परंतु जे लोक मनी मॅनेजमेंट अर्थात पैशाचे योग्य व्यवस्थापन करतात. अशा १० टक्के लोकांसाठी पैसा काम करतो. असा सिद्धांत सांगतो. तुम्हाला महिन्याला १० हजार रुपये मिळतात का १ लाख रुपये हे महत्त्वाचे नसून, त्याचा उपयोग तुम्हीं कसा करता. हे महत्त्वाचे असते. मनी मॅनेजमेंटचा सर्वात महत्त्वाचा सिद्धांत सांगतो की
तुमच्या उत्पन्नातील जास्तीतजास्त ५० टक्के भाग हा कुटुंबासाठी खर्च करा. १० टक्के बचत करा, जी अडचणीच्या वेळी कामी येइल. १० टक्के गुंतवणूक करा, ज्यामधून तुम्ही तुमची मोठी कामे, मोठी स्वप्ने पूर्ण करु शकाल. १० टक्के हे तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी, तुमचे ज्ञान वाढविण्यासाठी आणि ट्रेनिंग साठी ठेवा. १० टक्के हे कुटुंबाच्या आनंदासाठी ठेवा आणि शेवटचे १० टक्के हे दान आणि धर्मासाठी ठेवा, मनी मॅनेजमेंटचे वर सांगितलेले नियम वापरून तुम्ही नीती, नियम आणि सिद्धांताने वागलात तर, १०च वर्षांत तुम्ही टॉपच्या १० टक्क्यांच्या जवळ जाताल व २० वर्षे असेच पैशाचे व्यवस्थापन केले तर तुम्ही १० टक्के मधील श्रीमंत लोकांत पोहोचताल. हा माझा स्वअनुभव आहे. याच नियमाचे पालन करून मी १० टक्क्यांत पोहोचलो आहे.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v
