८४.भीतीला घालवा. डर के आगे जीत है
जगात भीती नसलेला माणूस सापडणे अवघड आहे. आपल्या यशाच्या आड येणारी गोष्ट म्हणजे भीती. भीतीचे अनेक प्रकार असतात. जसे मृत्यूची भीती, अपयशाची भीती, गरीबीची भीती, चोराची, अपमानाची भीती. भुताची, सापाची, अंधाराची भीती. यशस्वी लोक तेच असतात जे भीतीलाच चॅलेंज करतात. भीतीचेच हत्यार वापरून जीवनात यशस्वी होतात.
तुम्ही गिनीज बुकात नाव नोंदवलेल्या नागपूरच्या ज्योती आमगेचे नाव ऐकलेच असेल. ती जगातील सर्वात ठेंगणी, बुटकी बाई आहे. तिची उंची फक्त २ फूट १ इंच आहे. जन्मापासूनच तिची उंची न वाढल्यामुळे ती इतरांच्या टिंगल टवाळीचा विषय बनली होती. बुटकेपणाच्या भीतीने मोठी होईपर्यंत ती घराबाहेरच पडली नाही. परंतु घरच्यांनी धीर दिल्याने, तिचे मन तिने खंबीर केले आणि लोक काय म्हणतील याकडे दुर्लक्ष करून बुटकेपणालाच ताकद बनवली. आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत, हेच दाखवायला तिने सुरुवात केली.
त्यामुळे ती आज एक यशस्वी सेलिब्रिटी बनली आहे. तिने अमेरिकेच्या फ्रिक शो मध्ये सुद्धा काम करून नाव व पैसा कमावला आहे. तिला कार्यक्रमाला बोलावण्यासाठी खूप पैसे मोजावे लागतात. यशासाठी डरो मत ! क्योंकी डर के आगे जीत है! असे म्हणतात, जो डर गया, सो मर गया! हीच भीती घालविण्यासाठी, कोणीतरी सुंदर ओळी लिहिल्यात त्या अशा,
डर से तू मत डर ! कुछ अलग कर, !
जिंदगी के हर मोड पर, डर तुझे सतायेगा,!
उसी डर और दर्द का फायदा डर उठायेगा !
तेरी हर कमजोरी पर ! ये डर घर बनायेगा !
लेकीन अगर तुम, अपना हुन्नर दिखायेगा !
उसी कमजोरी को तू ताकद बनायेगा ! उसी दिन से डर तुझे डरेगा!
जरूर डरेगा ! जरूर डरेगा!
डर से तू मत डर ! कुछ अलग कर ! हमेशा याद रख,
डर के आगे जीत है! जीत हैं! जीत हैं!
____________________________________________________________________________________________________________
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
