८५.उत्पन्नाचे स्रोत वाढवा : Multiple Source of Income
तुम्ही जे पैसे कमवता, त्यामध्ये तुम्ही समाधानी आहात का? नसाल तर का? कोणामुळे? कशामुळे? तर त्याचे उत्तर आहे, तुमच्या विचारामुळेच. जर तुम्ही अंतर्मनाने ठरविले तर, आजच्या पेक्षा तुम्ही तुमचे उत्पन्न २ ते ३ पट सहज वाढवू शकता.
तुम्हाला जर तुमचे उत्पन्न वाढवायचे असेल तर, शांतचित्त आणि विचार करून आपल्या सध्याच्या उद्योगाबरोबर आपण याला जोडून काय करू शकतो त्याचा प्रथम विचार करा. त्या मध्ये येणाऱ्या अडचणी दूर करा. प्रथम आळस दूर करा, सूर्योदयापूर्वी उठा. मेडिटेशन म्हणजे ध्यानधारणा करायला सुरुवात करा, त्यामधून तुम्हाला प्रेरणा म्हणजे इन्स्पिरेशन मिळेल. मोटिवेशन
हे बाहेरून असते तर इन्स्पिरेशन हे अंर्तमनापासून असते.
असे म्हणतात Meditation is 100 times more useful than motivation, तुम्ही तुमच्या कंफर्ट झोन मधून बाहेर पडा. तुमच्या उत्पन्नाचे स्रोत तुम्हीच वाढवू शकता. म्हणून दुसऱ्यांना दोष देणे बंद करा. विहिरीला एकच मोठा नळ लागण्यापेक्षा, छोटे छोटे अनेक सळ फायदेशीर असतात. कारण जर एक नळ बंद पडला तर, विहीर कोरडी पडते. पण त्या विहिरीला जर अनेक नळ असतील तर विहीर कधीच आटत नाही.
गुंतवणुकीबद्दल जसे बोलले जाते की Don’t put all your eggs in a single basket. त्याचप्रमाणे उत्पन्नाबद्दलही बोलले जाते की, Don’t depend on single income. एकाच उत्पन्नावर अवलंबून राहू नका. तुमचा सध्याचा एकच उत्पन्नाचा स्रोत कितीही मोठा असला तरी, भविष्यात काय अडचणी येतील ते तुम्ही सांगू शकत नाहीत.
त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणून मुंबईच्या डबेवाल्यांचे देता येईल. मुंबईच्या डबेवाल्यांना १०० वर्षांपेक्षा जास्तीचा इतिहास आहे. त्यांच्याकडून अनेकांनी मॅनेजमेंटचे धडे घेतलेले आहेत. इंग्लंडच्या राणीनेही त्यांना लंडनमध्ये
बोलावून सत्कार केला होता. पण कोरोना नंतर त्यांचे कंबरडेच मोडले. कारण कोरोनाच्या अगोदर ५ हजार डबेवाल्यांचा संसार आनंदात चालू होता. परंतु कोरोना मध्ये सगळीकडे कर्फ्यूसारखी परिस्थिती झाली. त्यामुळे सर्व डबेवाल्यांचा धंदा बंद झाला. आता कोरोना संपून एक दीड वर्ष झाले असले तरी हजारो कर्मचारी वर्क फ्रॉम होम म्हणजे घरूनच काम करीत असल्यामुळे ५ हजार पैकी ४ हजार डबे वाल्यांचा रोजगार बुडाला आहे. त्यांना आता एक तर मुंबई सोडण्याची वेळ आली आहे किंवा दुसरा छोटा मोठा व्यवसाय, नोकरी करण्याची वेळ आलेली आहे. याचं महत्त्वाचं कारण डबेवाले फक्त एकाच
उत्पन्नावर अवलंबून राहिले. ते फक्त ठराविक लोकांनाच डबे पुरविण्याची सेवा देत होते. या सेवेबरोबरच त्यांनी जे बॅचलर म्हणून एकटे राहतात त्यांना जर स्वतःच्या घरून काही डबे तयार करून पुरविले असते तर ते डब्याच्या सेवेबरोबर जेवणाचे उत्पादनही करू शकले असते. आज ते छोटे-मोटे रेस्टॉरंट, हॉटेल उघडू शकले असते. किंवा हॉटेलमध्ये त्यांना चांगली नोकरीही मिळाली असती. त्यामधून त्यांना उत्पन्नाचा दुसरा मार्गही सापडला असता. त्याचबरोबर डब्या व्यतिरिक्त कुरिअरची सेवा दिली असती, पार्सल सेवा दिली असती, तर त्यांच्या उत्पन्नाचे अनेक मार्गही त्यांना मिळाले असते. आज डबेवाल्यांवर जी वेळ आली ती वेळ आली नसती. परंतु ते फक्त एकाच उत्पन्नावर अवलंब राहिल्याने, आज हजारो लोकांचा रोजगार बुडाला आहे. त्याबरोबर त्यांच्यावर उपासमारीची वेळही आली आहे.
म्हणूनच तुमचा एखादा धंदा किंवा नोकरी जोरात चालू असतानाच त्याला पूरक असा जोडधंदा चालू करा आणि तुमच्या उत्पन्नाचे अनेक मार्ग चालू करून तुम्ही आजच्या पेक्षा २ ते ३ पटीत श्रीमंत व्हा.
तुम्हाला जर फेमस व्हायचं असेल तर तुम्ही तुमच्या क्षेत्रात टॉपर बना. तुमच्याकडील ज्ञान, धन आणि प्रेम हे दुसऱ्यांना वाटायला शिका. तुमच्याकडे जे आहे ते दुसऱ्याला दिले, तर ते गुणाकाराने तुम्हाला परत मिळते, हा माझा स्व अनुभव आहे.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
