१२. यशस्वी राजा-उद्योजक होण्याची चतुःसूत्री
२. विस्तार – Scalability भविष्य.
राजे आपण जो काही व्यापार उद्योगधंदा करायचा तो केवळ आजचा विचार करून नाही तर त्यात उद्याचा देखील विचार व्हायला पाहिजे. आपण आपला उद्योग व्यापार याचा विस्तार कसा करायचा याची देखील रणनिती बनविली पाहिजे. केवळ एकट्याने राबून कोणताही उद्योग मोठा होत नसतो. त्यासाठी हाताखाली अनेक माणसे नेमावी लागतात. आणि कामाचे वाटप करावे लागते. आपले काम करणारी प्रसंगी आपणापेक्षा हुशार माणसे पदरी ठेवायची, त्यांना मोठा पगार द्यायचा आणि आपले सगळे काम त्यांच्याकडून नीट करून घ्यायचे. आपला उद्योग विस्तार करायचा असेल त्याला भविष्यात वाढवायचा असेल तर मग त्याला एक बांगला पर्याय आहे. तो उद्योग पारदर्शी बनवा.
म्हणजे तो उद्योग नक्की काय केला जातो ती पूर्ण प्रक्रिया आपल्या माणसांना समजेल अशी बनवा. जेणेकरून जे काम तुम्ही करता तेच काम इतर माणसांनादेखील करता यायला पाहिजे. लोकांना तसे प्रशिक्षण देऊन तयार करायचे, तुमच्या गैरहजेरीत देखील तो उद्योग तेवढ्याच ताकदीने चालू राहिला पाहिजे. असा एक उद्योग सुरू करा, तो चालविण्याचा एक standard operating system म्हणजे नियम बनवा. तो लोकांना कसा पाळायचा ते शिकवा. त्याची नियमावली mannual बनवा आणि लोकांना त्या नियमाप्रमाणे नियमावलीप्रमाणे काम करायला सांगा. पहा, धंदा हजार पटीत वाढतो की नाही.
तुम्ही जर तुमच्यासारखी माणसं घडवलीत तरच तुमचा उद्योग हजार पटीने वाढेल आणि तुमच्या नंतरही चालू शकेल तेव्हा उद्योगाचा विस्तार करायचा तर आपणासारखी माणसं घडवा ती माणसं हुशार कर्तबगार प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ अशीच घडवा. पहा आपल्या राज्याचा, उद्योगाचा विस्तार होतो की नाही. सगळी कामे स्वतः करायचा नाद मराठी माणसाने सोडून द्या आणि एक कामी हाती घ्या पण ते नीट तडीस लावा.
लोकांना एवढं चांगलं प्रशिक्षित करा की आपलं राज्य, उद्योग Pilot Mode स्वयंचलित प्रणालीवर चालला पाहिजे. महाराजांनी जिजाऊसाहेबांच्या या शिकवणीनुसार नेताजी पालकर यांना प्रतिशिवाजी बनवले. पुढे असे अनेक प्रतिशिवाजी घडविण्याचा कार्यक्रम चालूच राहीला, माणसं वाढत गेली. लष्कर वाढत गेले, किल्ले वाढत गेले, भूप्रदेश वाढत गेला आणि स्वराज्याचा विस्तार भारताच्या सहा राज्यात ४८ जिल्ह्यात झाला. पुढे हा विस्तार महाराजांच्या निधनानंतरही कायम राहीला आणि संपूर्ण भारतावर मराठ्यांचे राज्य निर्माण करता आले. हा स्वराज्याचा विस्तार झालाच नसता. जर नेताजी, प्रतापराव, हंबीरराव, संताजी, धनाजी, मल्हारराव, बाजीराव हे
सेनापती घडले नसते.
तेव्हा विस्तार करायचा तर अगोदर माणसांमध्ये करा. ही उद्योजकतेची बीजे माणसांमध्ये पेरा. आपल्याकडील ज्ञान आणि कौशल्य या हाताखालील लोकांना देऊन प्रशिक्षित करा. यासाठीच शिवाजी महाराजांनी एक गनिमी कावा ही युद्ध पद्धती निर्माण केली होती. याला आपण standard operation system म्हणूया. आणि हे युद्ध कसे खेळायचे याचे अठरा नियम बनवले. यालाच आपण Manual म्हणूया. याचाच उपयोग करून मराठ्यांनी पुढे १०० वर्षे स्वराज्य राखले, विस्तार केले आणि लढाया टाळून जास्तीत जास्त छापे घालून स्वराज्याचा संपूर्ण भारतावर भगवा झेंडा फडकवला. तुम्ही सुद्धा ही तत्त्वे नीट समजून घेऊन जगावर आपला झेंडा फडकण्यासाठी तयारी करा.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v
