१३. वेगाने यश मिळविण्यासाठी काय करावे?
१) माहिती नीट ऐका –
आपणाकडे आलेली माहिती लक्ष देऊन ऐका, मिळणारी माहिती अत्यंत महत्त्वाची किंवा उपयोगाची असू शकते तेव्हा ही माहिती ऐकण्यासाठी वेळ लावू नका आणि जेव्हा ती माहिती तुम्हाला दिली जाईल तेव्हा ती नीट लक्ष देऊन ऐका. जर माहिती ऐकण्यातच चूक झाली तर पुढचा सगळा गोंधळ कोणत्याही परिस्थितीत थांबवता येणार नाही. माहिती चांगली असून जर ती नीट ऐकली नाही तर मग खूप मोठ्या फायद्यावाचून संधीपासून वंचित राहांवे
लागू शकते. आणि जर ती माहिती धोक्याबाबत असेल आणि जर ती नीट ऐकली नाही तर मग मोठ्या संकटापासून, धोक्यापासून किंवा नुकसानीपासून तुम्हाला कोणीही वाचवू शकत नाही आणि तुम्ही ताकद क्षमता अफाट असली तरी मग काही उपयोग होण्याचे कारण नाही. तेव्हा मिळणारी माहिती अगोदर नीट ऐका. अर्थात दोन्ही कानांनी लक्ष देऊन ऐका. एका कानाने ऐकू नका आणि दुसऱ्या कानाने सोडून देऊ नका.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v
