१३. वेगाने यश मिळविण्यासाठी काय करावे?
५) अंमलात आणा –
आता राजे तुम्ही जो प्लॅन बनविला आहे, जी योजना बनविली आहे ती नीट अंमलात आणा. जगातील उत्कृष्ट योजना कोणती असे म्हणाल तर जी अंमलात आणता येते अशी. जी योजना अंमलातच आणता येणार नाही Apply करता येणार नाही ती योजना कितीही भारी असली तरी काही उपयोगाची नाही. त्यापेक्षा छोटी योजना बनवा पण ती अंमलात आणता येईल अशीच बनवा. Best plann is that which can be executed.
तेव्हा तुम्हाला मिळालेली माहिती अचूक आहे, ती तुम्ही नीट ऐकली आहे, नीट समजून घेतली आहेत त्यावर नीट चिंतन देखील केले आहे, आणि चांगली योजना देखील बनविलेली आहे तर मग आता तुमचे यश फक्त एकाच गोष्टीवर अवलंबून आहे आणि ती गोष्ट म्हणजे चांगली बनविलेली योजना नीट अंमलात आणा, तुम्हाला वेगाने यश मिळवण्याचा हा एकच शाश्वत मार्ग आहे. या पाच पायऱ्या नीट वापरात आणल्या तर राजे तुम्हाला वेगाने यश मिळविण्यापासून कोणतीही ताकद रोखू शकणार नाही.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v
