१००.उधारी देणे टाळा
गरीब लोक खोट्या प्रतिष्ठेपायी लग्न कार्यावर उधारीने खूप खर्च करतान व अधिक गरीब बनतात. क्रेडिट कार्डवर मिळते म्हणून लोक गरज नसलेल्या गोष्टी विकत घेतात. क्रेडिट म्हणजे उधारी. विचाराने गरीब असलेले लोकच क्रेडिट कार्ड वापरतात. त्यामुळे ते कधीच धनवान बनत नसतात. म्हणून क्रेडिट कार्डाचा वापर करू नका.
नव्याने सुरू झालेल्या व्यवसायांपैकी एक वर्षाच्या आत ५० टक्के व्यवसाय बंद होतात, तर पुढील तीन वर्षात उरलेल्यापैकी ५० टक्के बंद होतात. त्याचे प्रमुख कारण उधारी बुडणे असते. व्यवसाय वाढीसाठी उधारीऐवजी तुम्ही डिस्काउंट द्या, काही ऑफर द्या, किंवा सॅम्पल वाटा. उधारीमध्ये आपलेच खेळते भांडवल गुंतलेले असते व त्यावरचे व्याजही आपल्यालाच भरावे लागते. म्हणून उधार देणे टाळा. द्यायचेच असेल तर ग्राहकाची विश्वासार्हता तपासून, पक्क्या बिलात व पुढील तारखेचा चेक घेऊनच द्या. म्हणजे उधारी आली नाही तरी कायद्याने वसूल करता येईल. उधारी वसुलीसाठी लक्ष देऊन प्रयत्न करा. कारण उधारी देणारे घेणारे कधीच धनवान बनत नाहीत हा सिद्धांत सांगतो. काही व्यावसायिक ग्राहकाने उधार मागितल्यावर जास्त दराने माल विकून आनंदात मनाचेच मांडे रचतात. ग्राहकही तक्रार करत नाही. कारण त्याला उधारीचे पैसे द्यायचे नसतात. अशा विचारांचे व्यवसाय १०० टक्के बुडतात आणि व्यवसाय बंद करताना शिल्लक राहिलेला माल कचऱ्याच्या भावातच विकावा लागतो. म्हणून उधार देण्याची प्रवृत्ती टाळा आणि आपल्या व्यवसायात यशस्वी व्हा.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
