१६.अपयशातून यशाकडे जाण्याचा मार्ग तयार करा.

१६. अपयशातून यशाकडे जाण्याचा मार्ग तयार करा.

५. गेम चेंजिंग वागणं शिका गेम चेंज करायला शिका –

शिवबाराजे प्रत्येकाचे आयुष्य हाच एक मोठा डाव आहे. आणि बरेचजण आपणाला हरवण्यासाठी टपून बसलेले असतात. कधी ते शत्रू म्हणून समोरून वार करतात तर कधी ते मित्र, नातेवाईक यांच्या रुपाने बगलेत सुरा घेऊन आपणासोबत चालताना दिसतात. अशा प्रसंगी आपण खूपच सावध असले पाहिजे. शत्रूवर विश्वास ठेवायचा नसतो तसाच मित्रावर पण कायम विश्वास ठेवण्याचे टाळले पाहिजे. कारण आजचा मित्र काहीतरी कारणाने जर उद्या आपला शत्रू झाला तर मग? तेव्हा शक्यतो कोणी आपणाला दगा फटका करणारच नाही याची दक्षता घ्या. संकटे येतील आणि जातील परंतु बेपर्वा राहिल्याने गाफील राहिल्याने येणारी संकटे ही आपणाला एवढी जबरदस्त नुकसान करू शकतात की आपण परत त्यातून उठणे अवघड जाऊ शकते. तेव्हा परिस्थिती काही असो प्रसंग कसाही असो आपण आपली वागणूक किंवा सवय अशीच ठेवा की ती गेम चेंजिंग म्हणून सिद्ध झालीच पाहिजे.

गेम चेंज करणे म्हणजे काय असा प्रश्न जर तुम्हाला असेल तर मग याचा अर्थ काय ते नीट समजून घ्या. गेम चेंज करणे म्हणजे जेव्हा लोकांना असे वाटते की आता तुम्ही संपणारच आता तुम्ही हारणारच तेव्हाच त्या परिस्थितीला अशी कलाटणी द्यायची की लोकांना आश्चर्याचा धक्काच बसावा. शत्रूने एवढी तयारी करावी की तो आपणाला हरवणारच अशी त्याची ठाम समजूत असतानाच असा एखादा डाव टाकायचा की खेळाचा, युद्धाचा सगळा रंगच बदलून गेला पाहिजे. आता जिंकणारच असा शत्रू म्हणेपर्यंत त्याला असा टोला द्यायचा की आता मेलो ठार असे म्हणायलासुद्धा त्याला शिल्लक ठेवायचे नाही. सुरूवात शत्रूला करू देत पण शेवट मात्र आपण करायचा. शत्रूला पहिली चाल करू देत आपण त्याला योग्य रणक्षेत्रात अर्थात आपणाला अनुकूल अशाच रणक्षेत्रात खेचायचे आणि एकच चाल खेळायची ती शेवटचीच ठरली पाहिजे आणि शत्रूचा शेवटच झाला पाहिजे. आणि जर एखादवेळी गणित बरोबर बसले नाही आणि आपणालाच मोठा धक्का अगदी सेट बँक देणारा धक्का बसला तरी लगेच त्यातून स्वतःला सावरा आणि परत उठून उभे रहा. तुम्ही पडण्याचा वेग आणि परत उठण्याचा वेग यात अंतर पडू देऊ नका. ज्या वेगाने खाली पडाल त्याच वेगाने परत उसळी मारून Bounce back वर या शत्रू जेवढा तुम्हाला दाबायचा प्रयत्न करील तेवढ्या ताकदीने तुम्ही परत वर उसळी मारायची, मुसंडी मारायची. ३६० कोनात एवढ्या वेगाने फिरा की तुम्ही परत आपल्या जागेवर स्थिर उभे राहिलेले जगाला दिसले पाहिजे. अपयश हे तत्कालिक असते पण त्याचा परिणाम हा दूरगामी असतो. म्हणूनच अपयशाला जास्त वेळ रेंगाळू द्यायचे नाही. अपयशाला परत अशक्य वाटणारा विजय प्राप्त करायचा यालाच म्हणता खेळ बदलणे, डाव पलटणे आणि बाजी मारणे.

वाट राजमाता जिजाऊंच्या या शिकवणीप्रमाणे महाराज स्वतःवर आलेल्या अनेक प्रसंगातून असे उठलेच. अनेक हारणाऱ्या लढाया त्यांनी जिंकल्या आणि हिच कला आपल्या मावळ्यांना शिकवली आणि जो कोणी असा गेम चेंजर बाजी पलटणारा पराक्रमी माणूस पुढे आला. त्यांना पदवीच दिली बाजी. यापेक्षा मोठा पराक्रम करणाऱ्याला ‘बाजीराव’ ही पदवी दिली. म्हणूनच महाराष्ट्रात आणि मराठी लोकात शिवाजी या नावाखालील दुसरे एक नाव ठेवले जाते आणि ते म्हणजे बाजीराव. game changing behaviour चे यापेक्षा ज्वलंत उदाहरण ते काय ठरावे? महाराजांच्या पदरी असे अनेक बाजी
होते.

शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यात हे अनेक प्रसंगातून सिद्ध करून दाखविले की आपण डाव पलटणारे व्यक्तिमत्त्व game changing behaviour असणारे व्यक्तिमत्त्व आहे. यातील काही प्रसंग पहा म्हणजे लक्षात येईल. वयाच्या १७ व्या वर्षीच फतेहखान स्वराज्यावर चालून आला, स्वराज्य संपणारच. हे रोपटे उखडून फेकले जाणार असेच सर्वांना वाटत असतानाच महाराजांनी मोठ्या युक्तीने फतेहखानाचा पराभव करून बाजी पलटवली. पुढे अफजलखान चालून आला. शिवाजी महाराजांना तो मारणारच, स्वराज्य बुडवणारच असे सगळ्या जगाला वाटत असतानाच महाराजांनी सिंहाप्रमाणे जबरदस्त नियोजन केले. योग्यवेळी त्वरीत कारवाई केली आणि अफजलखान त्याचे दहा अंगरक्षक आणि ४५००० फौज यासह संपूर्ण बुडविला.

असाच आणखी एक मोठा प्रसंग सिद्धी जोहरचा. त्याने सत्याहत्तर हजार (७७०००) फौजेसह पन्हाळ्याला वेढा घातला आणि चार महिने महाराजांना कोंडले आता महाराजांना शरणच जावे लागणार असे जगाला वाटत असतानाच महाराज १२ जुलैच्या रात्री मुसळधार पावसातून किट्ट अंधारातून पांढरेपाणी, घोडखिंड ते विशाळगड पायथा अशी तीन युद्धे करून सहीसलामत विशाळगडावर पोहोचले.

सर्वात मुख्य प्रसंग तर पुढे आहे. आणि तो आहे आण्याचा. महाराजांना औरंगजेबाने वाढदिवसाला बोलावले आणि कैद केले. चार महिने परत महाराज कोंडले गेले. आणि मग पुढे योग्य ते डाव टाकत महाराजांनी डावच पलटी केला. औरंजेबाच्या २६०,००० फौजेच्या हातावर तुरी देत पोलादखानाला उल्लू बनवत १७ ऑगस्ट १६६६ ला महाराज वेषांतर करून निसटले आणि २४ दिवसातच राजगडावर आले. शिवाजी महाराज कैदेतच मरणार किंवा मारले जाणार अशी संपूर्ण जगाला खात्रीच पटलेली असतानाच ही गोष्ट महाराजांनी

घडवून आणली. यालाच म्हणतात बाजीगर. यासाठी हवे असते फक्त जीगर म्हणजे वाघाचे काळीज. लक्षात ठेवा तुम्ही सुद्धा त्या वाघाचेच वंशज आहात तुम्ही सुद्धा तशीच आयुष्यात झेप घ्या आणि आपणही गेम चेंजर बाजीराव
आहात हे सिद्ध करा. तुम्ही संपणार संपले असे जग म्हणत असतानाच तुम्ही अशी कृती करा की बाजी पलटली पाहिजे. आणि तुम्ही हारणारी बाजी जिंकली पाहिजे. यश पक्के असताना, फीक्स असताना तर कोणीही लढेल परंतु जेव्हा यशाची शक्यताच नाही केवळ Risk च आहे, जोखीमच आहे. अशावेळी लढून जर तुम्ही जिंकलात तर याचा अर्थ स्पष्ट आहे तुम्ही बाजीगर आहात. तुमच्यात गेम चेंजिंग वृत्ती आहे. आणि तुम्ही पडता पडता लढणारे उसळी मारणारे उमदे आहात.

तेव्हाचला उठा, लढ झगड-पर-आगे बढ. एकतर्फा मिळणाऱ्या विजयाची जगाच्या बाजारात तशी कमीच किंमत असते. जगाच्या बाजारात घासून मिळालेला विजय अवघड स्पर्धा जिंकून मिळालेला विजयच खूप मोठा अमूल्य असतो. तेव्हा असं लोकांना अशक्य वाटणारं यश प्राप्त करून दाखवा. तेही उभ्या जगाशी तगडी स्पर्धा करून.

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!