१०९.नशा आणि जुगारापासून दूर राहा
परमेश्वराने रमेश्वराने आपणास सर्वोत्कृष्ट आणि अनमोल असे मनुष्य जीवन दिले आहे. त्याचा उपयोग सर्वोत्कृष्ट कार्य करण्यासाठी करा. मित्रांनो चांगल्या आणि सर्वोत्कृष्ट यशाला शॉर्टकट नसतो, आणि शॉर्टकटने मिळालेले यश हे चांगले आणि पर्मनंट नसते. एडिक्शन म्हणजेच नशेमुळे अनेकांचे जीवन बरबाद झाले आहे. होत आहे. त्यामुळे त्यांना अकाली मृत्यू येत आहे, तर काही अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहेत. मग ती नशा दारूची, चरस, गांजा, अफू सारख्या ड्रगची असू शकते. अलीकडे पॉर्न फिल्म पाहण्याची, तसेच मोबाईलवर ओटीटी
फिल्म तसेच रात्री उशिरापर्यंत जागून नको त्या गोष्टी, ऑनलाइन गेम खेळणारे काही तरुण दिसतात. अलीकडे लहान मुलांना मोबाईलची नशा लागलेली दिसते, त्यामुळे अनेक मुलांची दृष्टी गेल्याचे, त्यांच्या मेंदूवर विपरीत परिणाम झाल्याचे आपण ऐकतो. नशेमुळे मानसिक संतुलन, मेंटल डिसऑर्डर होऊन अनेकांचे जीवन बरबाद झाले आहे. फिल्म स्टार संजय दत्त, परवीन बाबी, सुशांत सिंग यांचे करियर नशेमुळेच बरबाद झाले आहे. विनोद कांबळी हा सचिन तेंडुलकर पेक्षाही टॅलेंटेड होता. त्याच्या नावावर फक्त १४ टेस्टमध्ये एक हजार रन करण्याचे रेकॉर्ड आजही आहे. परंतु नशेमुळे आज तो हालाखीचे जीवन जगत आहे. अनेक पुढाऱ्यांचे करिअर पॉर्न फिल्म पाहिल्यामुळे बरबाद आलेले आहे,
आजकाल अनेकांना कमी कष्टात आणि झटपट श्रीमंत होण्याची नशा लागलेली आहे. त्यामुळेच ते ऑनलाइन रमी, जुगार, ड्रीम ११, जंगली रमी खेळताना दिसतात, रायगड जिल्ह्यातील पेणचा इंजिनीयर असलेला विश्वनाथ गावंड या तरुणाला ४७ लाख रुपयाचे वार्षिक पॅकेज होते. एक चांगली बायको, दहा वर्षांचा मुलगा आणि तीन वर्षांची मुलगी असा सुखी संसार असताना तो ऑनलाईन रमीच्या नादी लागला व चार कोटी रुपयांचा लॉस झाला म्हणून त्याने आत्महत्या केली. म्हणूनच ऑनलाइन गेम, रमी आणि ड्रग्स, दारूच्या नशेपासून दूर राहा. तुम्हाला नशा करायचीचं असेल तर यशाची करा, करिअरची करा, चारित्र्याची करा आणि तुमच्या जीवनात तुम्ही यशस्वी व्हा.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
