जडणघडणीचा काळ : जगण्याच्या व्यवहाराचे शिक्षण

जडणघडणीचा काळ :

जगण्याच्या व्यवहाराचे शिक्षण

एक झुरका अन् जन्माची अद्दल!

आजोबांच्या पुढाकारातून आम्हाला किराणा, कापड दुकान चालविण्याचाही अनुभव मिळाला. पुढे माझ्या जीवनात नोकरी करीत असताना व्यवसाय करण्याची महत्त्वाकांक्षा जागृत झाली. त्याचे मूळ कुठेतरी लहानपणी केलेल्या व्यवसायात आहे, असे मला वाटते. तर आजोबा व वडिलांनी ठरवले की, गावात आपण किराणादुकान थाटायचे. किराणादुकानात फक्त वाणसामानच न ठेवता आम्ही कापडही विकायला ठेवले. आमच्या वाड्याला
लागूनच एक खोली होती. तिचेव आभभा हा नवा व्यवसाय सुरू झाला. हिशेबाचे काम असल्याने साहजिकच माझी मर्जी या भेधासाठी लागली, मी शाळा करून सकाळी व संध्याकाळी दुकानात बसत असे. मलाही या कामाची गोडी लागली. दुकानासमोरच्या ओट्यावरील लोखंडी कॉटवर आजोबा देखरेख करीत बसलेले असायचे, संध्याकाळी विक्रीचा हिशेब करून हिशेब करून सगळे पैसे मोजून आजोबांच्या हवाली करायचे, असा माझा दिनक्रम होता.

आजोबा जमा झालेले पैसे कापडी बटण्यासारख्या पिशवीत ठेवत. त्यात नोटांपेक्षा चिल्लरच जास्त असायची. था काळातच माझ्या आयुष्यात एक मोठा धडा भी शिकलो. झाले असे आजोबा बिडी ओढायचे. निवांत वेळ असेल, तेव्हा ते विधी शिलगावून मस्तपैकी धूर काढत बसायचे. मी लहानपणापासून ते पाहत होतो. त्यांना

हमेत धूर सोडताना पाहून खूप मजा वाटायची. कधी कधी वाटायचे आपणही तशाच प्रकारे बिडीचा धूर काढला पाहिजे. पण आजोबांचा धाक व दरारा इतका होता की, इच्छा असूनही तशी संधी साधण्याची भीती वाटायची. तरीही त्या वयात असते तशी बिडीची अनावर ओढच लागली होती. एकदा तरी झुरका घेण्याचा विचार मनातून जात नव्हता. असेच एकदा सुगीचे दिवस होते. शेतात ज्वारीचे खळे लागले होते. संध्याकाळचे जेवण झाल्यावर

आम्ही सगळे खळ्यावरच झोपायला जायचो. राखणीचे कामही व्हायचे. या दरम्यान बिडी ओढायची इच्छा काही मला स्वस्थ बसू देत नव्हती. माझे सतत संधी शोधण्यावर लक्ष होते. एके दिवशी मी मनाचा धीर करून एक बिडी व काडीपेटी आमच्याच दुकानातून चोरली. ती व्यवस्थित चड्डीच्या खिशात लपवून ठेवली. आम्ही भावंडे खळ्यावर झोपण्याच्या तयारीने गेलो. खिशात बिडी असल्याने मला झोपही येत नव्हती. कधी एकदा बिडीचा शुरका घेईन, असे झाले होते. जरा सामसूम झाल्यावर मी हळूच पांघरुणातून बाहेर आलो. लघुशंकेला जाण्याचा बहाणा केला व जरा लांब आलो. वारे जोरात वाहत होते. त्यामुळे काडी पेटवून बिडी काही केल्या पेटेना. याच प्रयत्नात एक काडी पेटली, पण त्याने बिडी पेटण्याऐवजी आजूबाजूला असलेल्या पाचोळ्यानेच पेट घेतला. वडिलांनी पाहिले व ते पळत आले. पेटलेल्या पाचोळ्यावर पटकन पोत्याचा बारदाना टाकून आग विझवली. शेतात सर्वत्र खळे होते, सगळीकडे वाळलेला पाचोळा पडलेला होता. वडिलांनी वेळेत आग विझवली नसती, तर सगळेच पेटले असते. इतका भयानक प्रसंग माझ्या या कृत्यामुळे घडला होता. माझ्या दादांनी आयुष्यात कधी आम्हा कोणत्याही भावंडांना साधी चापट मारली नाही. पण त्यादिवशी दादांनी मला असा धपाटा मारला

की, तो आजही आठवतो. या प्रकारानंतर मी कधी आयुष्यात बिडी, सिगारेटच काय अन्य कोणत्याही व्यसनाच्या नादाला लागलो नाही. त्या वयात बालसुलभ उत्सुकतेतून झालेली चूक मी मनाचा निश्चय करून दुरुस्त केली. बिडीचा एक झुरका घेण्याची ओढ किती महागात पडू शकते, याचा अनुभव मी त्यावेळी घेतला व पुन्हा त्या वाटेकडे फिरकलो नाही. ‘व्यसन वाईट असते’ हे या घटनेने नकळत दाखवून दिले.

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!