उच्च शिक्षणासाठी औरंगाबादला

उच्च शिक्षणासाठी औरंगाबादला

आपण इथे एवख्या लांब कसे राहायचे? भी एकदम रडायला लागलो. वडीलही भावनिक झाले. त्यांनी मला सांगितले, “तुला आजोबांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, शिकला नाहीस, तर ते कसे पुरे होईल?”

पहिल्याच प्रयत्नात मी मंट्रिक उत्तीर्ण झाल्ने खरा, पण पुढे काय? हा मोठा प्रश्न होता. शिकायचे तर होतेच. मट्रिकनंतर कॉलेज असते, हे माहीत होते. पण ते नेमके काय असते, हे सांगणारेही जवळ कोणी नव्हते. आमच्या आशी तालुक्यात तर त्या वेळी एकही कॉलेज नव्हते. त्या वेळी पेंटशर्ट घातलेला जरा टापटीप माणूस दिसला की, बहील त्याला विचारायचे, “आमचं पोरगं फस क्लासमध्ये मॅट्रिक पास झालंय.. त्याला पुढे शिकवायचंय, काम करायला पाहिजे?” त्यांच्यालेखी पँटशर्ट घातलेला मग तो कोणताही माणूस असो -साहेबच होता. त्यात्प जास्त माहिती असेल, असे त्यांना वाटायचे. ते भोळेपणाने त्याला विचारायचे. समोरचाही त्याच्या त्याच्या बुद्धीप्रमाणे एकेक सल्ला द्यायचा. त्यातही अनेकांचे म्हणणे आले की, त्याला सायन्सला टाका. आमच्या तालुक्यात तर कॉलेज नव्हते. त्यामुळे आम्ही अहमदनगरला यायचे ठरविले, तेव्हा नगरमध्ये अहमदनगर महाविद्यालय प्रसिद्ध होते. आम्ही अॅडमिशन घेण्यासाठी नगरला निघालो. कड्यातून नगरची एस. टी. पकडली, माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मी एस.टी. मध्ये प्रत्यक्ष बसत होतो. तोपर्यंत कुठे लांब जाण्याचा प्रसंगच आला नव्हता. त्याम अ नव्हता. त्यामुळे एस.टी.चे केवळ दूरदर्शनच व्हायचे. एका मोठ्या व वेगळ्या जगात मी प्रथमच प्रवेश करीत होतो. माइयासाठी हा एसटीतला प्रवासही भारावणारा होता. तर आम्ही नगरला आलो व अहमदनगर महाविद्यालयात पोहोचलो. तिथल्या कार्यालयातील प्राध्यापकांनी माझे मार्कशीट पाहिले. त्यांनी माझ्या मार्कांचे कौतुकही केले. पण त्यांनी मला अॅडमिशन मिळणार नाही, असे सांगितले. त्यांच्या कॉलेजच्या अॅडमिशन पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. आम्हाला धक्काच बसला. निकाल लागून दोन-तीन दिवसच झाले होते. तरीही अॅडमिशन फुल्ल कसे झाले? त्यावर प्राध्यापकांनी खुलासा केला. त्या काळात आजच्यासारखे दहावी, बारावीला असते, तसे एकच बोर्ड नव्हते. पुणे, मराठवाडा तसेच इतर विभागांचे स्वतंत्र बोर्ड होते. प्रत्येक बोर्डाचा निकाल वेगवेगळ्या तारखेला लागत असे. मी मराठवाड्यातील बोर्डातून उत्तीर्ण झालो होतो. पण आमच्याआधीच पुणे बोर्डाचा निकाल लागून संबंधित बोर्डाच्या अखत्यारीतील महाविद्यालयांची प्रवेशप्रक्रियाही पूर्ण झाली होती.

अहमदनगर महाविद्यालयातील प्राध्यापकांनी आमची अडचण ओळखून आम्हाला पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश मिळू शकतो, असे सुचवून तेथे पाहण्यास सांगितले. तेवढ्यात एक प्राध्यापक म्हणाले, “तुम्ही प्रत्यक्ष पुण्याला हेलपाटा मारण्यापेक्षा त्या कॉलेजमध्ये फोन करून चौकशी करा, अॅडमिशन शिल्लक आहे का म्हणून.” आता त्यांनी फोन करायला सांगितला खरा; पण मला व वडिलांना फोन काय असतो, हे अजिबातच माहिती नव्हते. आमच्या संपूर्ण आष्टी तालुक्यात तेव्हा फोन नव्हता. त्यामुळे फोन कसा करायचा, नंबर काय असतो हे कळण्याचा विषयच नव्हता. वडिलांनी आमची अडचण प्राध्यापकांना सांगितली व ते म्हणाले, “सर तुम्हीच फोन करून चौकशी करा अन् आम्हाला सांगा. फोनचे काय पैसे असतील, ते मी देतो.”
प्राध्यापकांनीती आसची अडचण ओळखाली व कॉलेजमधूनच पुण्याला फोन केला. तेव्हा त्यांनी त्यांच्याकडील अॅडमिशनही पूर्ण झाल्याचे सांगितले. हे ऐकून आम्ही बोहे निराशच झालो. आता पुढे काय? असा प्रश्न निर्माण झाला. त्यावर एका प्राध्यापकाने सांगितले, “तुम्ही औरंगाबादच्या एस.बी. सायन्स कॉलेजात प्रयत्न करा, मराठवाडयात वेगळा बोर्ड असल्याने तिमे अॅडमिशन चालू असतील.” हे ऐकून मला थोडा धीर आला. आम्ही औरंगाचादला जायचे ठरवून गावी परत आलो. दोन-तीन दिवसांनी आम्ही औरंगाबादला गेलो. तिथे सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालयात प्रवेश घ्या, असा सल्ला आम्हाला मिळाला होता. औरंगाबादला जाताना मोठे बंधू

भगवानरावही आमच्यासोबत होते. ते मॅट्रिक सुटलेले असल्याने त्यांनाही कला शाखेत प्रवेश घ्यायचा होता. जातानाही आम्ही नगरमार्गेच औरंगाबाद गाठले. तिथे आमचे नातेवाईक नव्हते, पण आमच्या गावातील बन्सीभाऊ कदम यांची दोन मुले तिचे एपीआय कंपनीत कामाला होती. श्यामराव लगड हेही आमच्या गावातले होते व ते आयटीआय करून औरंगाबादेत नोकरी करीत होते. आम्ही पत्ता मिळवून औरंगाबादेतील त्यांच्या खोलीवर गेलो.

त्यांना शहराची माहिती असल्याने ते आमच्याबरोबरच कॉलेजमध्ये आले. माझे मार्क चांगले असल्याने मला लगेचच सायन्सला प्रवेश मिळाला. माझ्या बंधूंनाही कला शाखेत अॅडमिशन मिळाली. त्या काळी मॅट्रिकनंतर डिग्री कोर्सपूर्वी प्री-डिग्री कोर्स असायचा. दोन वर्षांचा तो अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर मेडिकल, इंजिनिअरिंग, बीएसस्सी या अभ्यासक्रमाची दिशा ठरायची. प्री-डिग्री म्हणजेच आताच्या काळातील बारावी, असे म्हटले तरी हरकत नाही. तर माझी अॅडमिशन झाल्यावर आम्ही परत गावी आलो.

घरी आलो आणि एक प्रकार घडला. मी अचानक तापाने फणफणलो. काही केल्या ताप उतरेना. सगळेच चितित झाले. तापाचे नेमके कारण कळेना. त्यावर मी सांगितले, “एस.टी.तून नगरहून औरंगाबादला जात असताना पांढरीपुलाचा घाट लागला. इतके प्रचंड मोठे डोंगर, दरी मी प्रथमच पाहत होतो. मला त्यावेळी ते दृष्य पाहून भुरळ पडल्यासारखं झालं.” त्यावर आईने ग्रामीण भागात पाहतात त्याप्रमाणे सकुन (‘शकुन’चा अपभ्रंश) पाहिले, त्यात मला डोंगराची काही तरी बाधा झाल्याचा होरा आला. आईने ग्रामीण भागातील प्रथेप्रमाणे काही तरी माझ्यावरून उतरवून टाकले, आश्चर्य म्हणजे या तोडग्याने माझ्या अंगातील आणि घरच्यांच्या डोक्यातील तापही उतरला.

 

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!