१९. प्रत्येक दिवशी आपण प्रगती करत आहोत की नाही याची खात्री करा
४) सर्वात महत्त्वाच्या कामावर लक्ष केंद्रित करा.
शिवबाराजे आपण दररोज प्रगती करत आहोत की नाही याची खात्री करण्याची ही चौथी आणि प्रमुख शिस्त होय. आपण कामाचे सगळे वाटप केले आणि आता त्यांचा प्राधान्यक्रम सुद्धा ठरविला. आता पुढची पायरी म्हणजे जी कामे केवळ तुम्हीच करू शकता अशी Distinet forte विशेष अशीच कामे तुम्ही करायची. आपले संपूर्ण लक्ष केवळ महत्त्वाच्या कामावर केंद्रित करा. कमी महत्त्वाची कामे कर्मचाऱ्यांना सांगा. महत्त्वाची कामे अधिकाऱ्यांना सांगा.
आणि सर्वात महत्त्वाची कामे तेवढी आपण स्वतः करा. या सर्वात महत्त्वाच्या कामामधील सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे नियोजन करणे आणि सर्वात जास्त फायदेशीर असणारी कंपनीला, राज्याला ८०% नफा महसूल मिळवून देणारी कामे तेवढी कामे करायची.
प्रत्येक दिवशी आपण प्रगती करायची खात्री द्यायची असेल तर सर्वात महत्त्वाच्या कामावर आपले लक्ष सतत केंद्रित करा आणि ते काम वेगाने, मोठ्या अचूकतेने पार पाडत चला. रोजचे काम रोजच संपले पाहिजे याची दक्षता घ्या. तुम्ही किती वेगाने प्रगती करणार हे तो तुम्ही किती महत्त्वाच्या कामावर लक्ष केंद्रित करता यावरच अवलंबून असते. म्हणून आपले लक्ष केवळ आणि केवळ सर्वात महत्त्वाच्या फायद्याच्या कामावर केंद्रित करा. ही एक प्रचंड चांगली अशी शिस्त तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरू शकते. काही प्रसंग आला तरी चुकूनही आपले लक्ष महत्त्वाच्या कामावरून हटवायचे नाही आणि चुकीची कामे Junk Activities यात गुंतून बसायचे नाही. छोटी कामे, अनावश्यक कामे यापासून सावध रहा. वेळ खाऊ कामे, खर्चीक कामे आणि अनुत्पादक कामे यात गुंतून पडायचे नाही.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
