२१. समाजाकडे मागे वळून पहा.

२१. समाजाकडे मागे वळून पहा.

आपले ध्येय केवळ राजा होण्याचे नाही ते तर एक माध्यम आहे लोकांची सेवा करायचे आणि समाजाच्या समस्या सोडवण्याचे. आपले राजेपण हे साधन आहे साध्य नक्कीच नाही. आणि म्हणूनच केवळ बोलून थांबायचे नाही तर प्रत्यक्ष कृतीच करायची. म्हणून आपल्या उत्पन्नातील किमान १०% उत्पन्न हे सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्ती संस्था यांना देत चला. फक्त ते दान देताना एक दक्षता घ्यायची आणि ती म्हणजे ते दान सत्कारणी जात आहे ना याची अगोदर खात्री करायची म्हणजे ते समाजाच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय प्रभावी ठरते. जेव्हा आपण कोणाला दान देऊ तेव्हा ज्याला द्यायचे ज्या कामासाठी द्यायचे त्यांच्या बद्दलची संपूर्ण माहिती अवश्य घ्या. त्यासाठी आधी अशा माणसांचा संस्थाचा शोध घ्या, खात्री करा आणि ते पैसे आपण ज्या हेतूसाठी देत आहोत त्याच कामासाठी उपयोगात येतील याची काळजी घ्या. आणि अशा लोकांना देणगी दिल्यानंतर त्यांच्याकडून कुठलीही अपेक्षा बाळगू नका. आपण त्यांच्यावर उपकार करत नसून आपणाला आपले पैसे योग्य कामासाठी देण्याची संधी दिली म्हणून उलट त्यांचेच आभार माना. इतरांसाठी काहीतरी करणं हा अनुभवच खूप मोठा आणि सुंदर असतो. तेव्हा शिवबाराजे हे नेहमी लक्षात ठेवा की निरपेक्षपणे जेवढं तुम्ही समाजाला द्याल तेवढे जास्त लाभ तुमच्याकडे अनपेक्षितपणे येत असतात.

डायचं नाव. यश. समाधान: म्हणूनच ज्याला ज्याला मोठं व्हायचं नाव, यश, समाधान मिळवायचे त्या सर्व लोकांनी हा नियम लक्षात ठेवा. तुम्ही वाटत जा तुम्ही वाढतच जाल आणि तुम्ही जमा करत जा तुम्ही इतिहास जमा व्हाल. म्हणूनच समाजकार्याला मोठा हातभार लावा. समाजाला उभे करा तो समाजच आपणाला उभे करील, समाजाचा विकास करा आपला विकास आपोआप होतो. राजमाता जिजाऊसाहेब यांच्या या शिकवणीप्रमाणे महाराज बालवयापासून मोठा दानधर्म करू लागले. सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि समाज घडवणाऱ्या संस्थांना मोठी मदत करू लागले. सुरूवात रयतेपासून होती. पुण्यात आल्याबरोबर रयतेला बि-बियाणे, नांगर, पाणी, बैल बारदाणा ते जमीन असं सर्व काही महाराजांनी दिलं. विशेष म्हणजे स्वराज्य स्थापनेपूर्वीपासून महाराज हे काम करत आले. यातूनच महाराजांना जीवाला जीव देणारी ईमानी माणसे भेटली. पुढे वयाच्या केवळ १७ व्या वर्षी महाराजांनी देहूचे संत तुकोबाराय यांना हिरे-माणिक आणि मोठी संपत्ती भेट म्हणून पाठविली. आपल्याला सामाजिक कार्य करायला कमी वेळ मिळेल म्हणून महाराजांनी त्यांच्या मंत्रिमंडळात एक संपूर्ण मंत्रीच या कामासाठी नियुक्त केला. त्याचे नाव दानाध्यक्ष. म्हणजे हे संपूर्ण खाते एकच काम करत होते. सामाजिक कार्य करणारांना, विद्वानांना, अभ्यासू माणसांना लोक घडवणाऱ्या माणसांना मदत करणे, दानधर्म करणे. आजच्या भाषेत, CSR, कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सीबिलीटी खाते. वयाच्या बाराव्या वर्षापासून महाराजांचे हे खाते मोठ्या प्रमाणात काम करत होते. हे कमी की काय म्हणून महाराज आणि जिजाऊसाहेब स्वतः खाजगीतून आणखी लोकांना मदत करत असत. समाजातील एकही घटक मदतीपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेत.

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)

 

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2vv

 

error: Content is protected !!