माझी भाग्यलक्ष्मी : सौ. सुनंदा

माझी भाग्यलक्ष्मी : सौ. सुनंदा

ज्योतिष्याचे भाकीत

पुढे माझा बिझनेस जोरात चालू लागल्यावर मी नोकरीचा राजीनामा दिला व पूर्णवेळ बिझनेस करू लागलो. त्याआधी साधारण तीन-चार वर्षे मी हा विचार करीत होतो. त्यावेळी एक घटना घडली होती. एकदा असाच मी अहमदनगरला सासुरवाडीला गेलो होतो. त्यावेळी खाकीदास बाबा मठाजवळ एक काठमांडूचे ज्योतिषी आले होते. त्यांच्या भविष्यवाणीची प्रचिती अनेकांना आली होती. ज्योतिष वगैरेवर माझा तितकासा विश्वास नाही. समाँनी दासबोधात ज्योतिषविद्येबद्दल म्हटले आहे,

उत्तम मध्यम कनिष्ठ रेखा।

अदृष्टीची गुप्त रेखा।

चत्वार अनुभव सारिखा। होत नाही।।

ज्योतिषी हातावरच्या रेषांची विभागणी उत्तम, मध्यम व कनिष्ठ अशी करतात. त्या शिवाय दैव ही आणखी एक अदृष्य दैवरेषा असते. त्यामुळे भविष्य वर्तविणाऱ्यांचा अनुभव सर्वांना सारखा येत नसतो. परंतु अनेकांनी सांगितल्यावर माझे मेहुणे मला त्या ज्योतिषाकडे घेऊन गेले.

मला वाटले, मेहुण्यांनाच ज्योतिष पहायचे असेल, पण तिथे गेल्यावर त्यांनी माझ्याकडे बोट दाखविलं. त्या ज्योतिष्याने प्रश्नकुंडली मांडली. म्हणजे मला माझा आवडता एक आकडा सांगायला लावला, आवडते फूल सांगायला लावले. असे काही प्रश्न विचारून त्यांनी त्यांच्या अभ्यासानुसार मला काही गोष्टी सांगितल्या. त्यांनी सांगितले, “आप जो बिझनेस करते हो, वह बिझनेस आपकी पत्नी के नामपे है, आपको इस बिझनेसमें बहोत तरक्की मिलने वाली है. इतनाही नहीं, आप जो नोकरी कर रहे हो, वह नोकरीभी आपके पास नहीं रहेगी.” मी हात न दाखविताही त्याचे हे भविष्य ऐकून उडालोच. माझे मेहुणेही हे ऐकून आश्चर्यचकित झाले. त्यांनी त्याला सांगितले, “आपको मालूम नहीं वो कौनसी नोकरी करते हैं. बड़े बैंक में वो अफसर है. उनकी नोकरी ऐसे कैसे जा सकती है? ऐसा बिलकुल नहीं हो सकता.” त्यावर ते ज्योतिषी म्हणाले, “चाहे ये कलेक्टर हो या कमिशनर, इनकी नौकरी जल्दीही जायेगी. उनके कुंडली में लिखा है. ये खुद अपनी फोर व्हिलरमें बँक जाके अपना इस्तिफा देंगे.” एवढे सांगून त्यांनी हेही सांगितले, “भविष्यातही जेव्हा कोणताही बिझनेस कराल, तेव्हा तुम्ही पत्नीच्याच नावानं तो करा. तुमचा नक्की भाग्योदय होईल.”

ज्योतिषी हे सगळे सांगत होते, तेव्हा माझ्याकडे कार नव्हती. बिझनेस जोरात असला, तरी मी नोकरी सोडण्याच्या निर्णयाप्रत आलेलो नव्हतो. माझा फक्त विचारच चालू होता. पुढे त्या ज्योतिष्याने सांगितलेल्या भविष्याची प्रचिती मला आली. अर्थात माझा आजही भविष्य वगैरे गोष्टींवर विश्वास नाही. परंतु कधी कधी नियती कोणत्या माध्यमातून तुम्हाला संकेत देईल, हे सांगता येत नाही. कोणती तरी अज्ञात शली सर्व करवून घेते, गोष्टी घडवून आणते, यावर मात्र माझी श्रद्धा आहे. माझी पत्नी खरोखरच माझ्यासाठी भाग्यलक्ष्मी ठरली. संसाराच्या सुरुवातीच्या काळात तिने खूप काट केले. संसारासाठी खूप काटकसर करून राहिली. ती माहेरी गेल्यावर रीतमात म्हणून तिला साडी घेतली जायची. पण ती साडीऐवजी रोख पैसे घ्यायची. ते पैसे ती आमच्या संसारामाठी वापरायची. मी नोकरी व विझनेसच्या मागे अक्षरशः वेड्यासारखा धावत होतो. यशस्वी होण्याची नशाच मता चढली होती. अशा वेळी तिने मुलांचा सांभाळ, त्यांचे शिक्षण याकडे बारकाईने लक्ष दिले. पाहुण्यारावळ्यांचे सगळे पाहिले. कधी तक्रार केली नाही. आजही तिची ही साथ माझ्यासाठी अनमोल आहे. तिच्या रूपाने साक्षात लक्ष्मीच आमच्या अंगणात नांदते, असे मला प्रामाणिकपणे वाटते. लक्ष्मी कुणाच्या पावलांनी येते काही सांगता येत नाही. परंतु माझ्याकडे मात्र ती पत्नीच्या पावलांनी आली एवढे खरे।

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

 

 

 

error: Content is protected !!