चौफेर घोडदौड

चौफेर घोडदौड

रेकॉर्डब्रेक बिझनेस ! रेकॉर्डब्रेक कमाई!

१९८२ ते १९९६ या काळात मी भारतातील सर्वात मोठ्या खासगी नॉन बैंकिंग कंपनीत मार्केटिंगचे काम केले. आधीच सांगितल्याप्रमाणे हा गुणाकाराचा व्यवसाय होता. कंपनीमार्फत जवळपास चाळीस लाख जणांना स्वयंरोजगाराचे साधन मिळाले होते. त्यापैकी माझ्या टीममध्ये १ लाख २७ हजार लोकांनी काम केले. इतके प्रचंड नेटवर्क मी उभे केले होते. या काळात मी माझ्या टीमच्या माध्यमातून कंपनीला २७५ कोटी रुपयांचा व्यवसाय दिला, त्यापोटी मला एक कोटीहून जास्त पैसे मिळाले. भारतातील दोन नंबरची व महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाची टीम मी तयार केली होती. सर्वात जास्त एजंट, सर्वाधिक विझनेस, सर्वात जास्त कमाई माझी होती. माझी म्हणजेच माझ्या पत्नीची. कारण व्यवसाय तिच्याच नावावर होता. या दरम्यान १९९५ ला भारताने खुल्या आर्थिक धोरणामुळे गॅट करार स्वीकारला. त्यामुळे आर्थिक क्षेत्रात अनेक घडामोडी घडल्या, त्याचा परिणाम मी काम करीत असलेल्या कंपनीवरही झाला. १८ रँकला मिळून पहिल्या वर्षीच्या हप्त्यावर आमच्या कंपनीत ३७टक्के इतके कमिशन मिळत असे. परंतु गॅट करार व रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधामुळे कमिशन १२.५ टक्क्यापर्यंत खाली आणावे लागले. त्यामुळे लाखो लोकांना स्वयंरोजगार देणाऱ्या कंपनीपुढील अडचणी वाढल्या, अखिल भारतीय स्तरावर अनेक मोर्चे निघाले. जाचक नियमांना विरोध दर्शविण्यात आला. आम्हीही मुंबई, कोलकाता, दिल्लीत हजारोंच्या संख्येने निघालेल्या मोर्चात सहभागी झालो. पण एकूणच देशाचे धोरणच बदललेले असल्याने आमच्या मागण्यांचे पुढे काही झाले नाही.

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!