कार्यारंभ करा, संघर्ष करा, श्रद्धा बाळगा…

कार्यारंभ करा, संघर्ष करा, श्रद्धा बाळगा…

जीवनातील संघर्षाला घाबरू नका

तुमच्या जीवनात, तुमच्या आयुष्यात जर तुम्हाला संघर्ष करावा लागत असेल, तर तुम्ही स्वतःला नशीबवान समजा. कारण देव संघर्ष करण्याची संधी त्यांनाच देतो, ज्यांच्यामध्ये क्षमता असते. आपल्या आयुष्याची सुरुवात रडण्याने होते व शेवट इतरांच्या रडण्याने होतो. आयुष्यातील मधला काळ असतो तो पुरुषार्थ दाखविण्यासाठीचाच ! त्या काळात खूप आनंदाने कष्ट करा. तुम्ही स्वतः आनंदी रहा व इतरांनाही आनंदी ठेवा.

भगवान श्रीकृष्णाची चरित्रकथा सांगते, तो जन्माला येण्याआधीच त्याला ठार मारण्याची तयारी झाली होती. त्यामधून तो वाचला. पुढील जीवनात अनेक संकटे आली, तो लढत राहिला. प्रसंगी पळून गेला; परंतु त्यासाठी त्याने ना उपासतापास केले, ना ज्योतिष्याला कुंडली दाखविली. जन्मभर कर्मयोगाचा पुरस्कार केला. भर रणांगणात अर्जुनाने धनुष्य खाली ठेवले, तेव्हा कृष्णाने ना कुंडली मांडली, ना गंडेदोरे बांधले. ‘तुला युद्ध करावेच लागेल!’ असे अर्जुनाला ठणकावून सांगितले. श्रीकृष्ण स्वतः धनुष्य घेऊन, लवून कौरवांचा नायनाट करू शकला असता. कारण तो सर्वांत शक्तिशाली योद्धा होता; परंतु त्याने अर्जुनाचे सारथ्य केले. कुरुक्षेत्रावर सर्वात शक्तिशाली व महान योद्धा असतानाही पांडवांना फक्त मार्गदर्शनाचेच काम त्याने केले. सर्व संघर्ष अर्जुनानेच केला.

मला असे वाटते, की या कृतीतून श्रीकृष्णाने समस्त मानवजातीला संदेश दिला, ‘जर तुम्ही स्वतःचा संघर्ष करण्यासाठी स्वतः सज्ज झालात, तर परमेश्वर अर्थात मी तुमच्या पाठीशी आहे. जर तुम्ही लढायला, संघर्षाला तयार नसाल; तर परमेश्वर तुमच्या वतीने ना लढणार, ना संघर्ष करणार! तुमच्या पदरात फुकटचे यश कधीच टाकणार नाही. यशासाठी शेवटपर्यंत संघर्ष करा. शस्त्र मध्येच खाली टाकू नका. तुमच्याजवळ असणारे गुण म्हणजेच तुमचे शस्त्र आहे. त्याचा वापर करा व जीवनात यशस्वी व्हा!’

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!