आदर्श व प्रेरणा… यशाचा राजमार्ग
रतनजी टाटा
आणखी एक व्यक्तिमत्त्व मला प्रचंड भावले. एखादा पैशाची गुर्मी दाखवू लागल्यावर आपण सहजपणे म्हणतो, “काय टाटा लागून गेला का?” किंवा एखादा काही व्यवसाय करीत असला, तरी सहजपणे म्हणतो, “आता तो टाटाबिर्ला होणार बहुतेक.” अशा या टाटा उद्योगसमूहाचे रतन टाटा मला भावतात. टाटांचा आदर्श कशासाठी, तर तो त्यांच्या साधी राहणी व उच्च विचारसरणी या गुणांमुळे. सर्वोच्च स्थानी असूनही त्यांच्या वागण्याबोलण्यात कुठेही तोरा दिसत नाही. त्यांच्या विनम्रतेचा एक किस्सा आहे. तुम्हालाही तो आवडेल. त्यापासून शिकायला मिळेल.
झालं असं की, एकदा सकाळी रतन टाटा तयार होऊन कंपनीत जायला निघाले होते. टाटा त्यावेळी त्यांच्या तत्त्वानुसार भाड्याच्या घरात रहायचे. ते निघाले असताना त्यांचा घरमालक आला व त्याने सांगितले, “या महिन्यात तुमच्याकडून अद्याप मला भाडं मिळालेलं नाही. असं मागायची वेळ कधी आली नाही, म्हणून मी आलो. कारण याआधी भाडं देण्याची तारीख तुमच्याकडून कधी चुकली नाही.” त्याचे हे बोलणे ऐकून टाटा वरमल्यासारखे झाले. त्यांनी प्रांजळपणे त्याला सांगितलं, “कामाच्या गडवडीत कदाचित माझ्या ऑफिसकडून भाडं देणं राहून गेलं असेल, मी तुमची क्षमा मागतो.” असे म्हणून टाटांनी चेक काढून लगेचच भाड्याची रक्कम घरमालकाला दिली. मालकाने चेक घेताना सहजपणे टाटांना म्हटले, “तुम्ही इतके मोठे उद्योगपती आहात. सर्व सुखं तुमच्या पायशी लोळण घेत आहेत. असं असताना तुम्ही भाड्याच्या घरात राहता, याचं मला आश्चर्य वाटते.” त्यावर टाटांनी दिलेले उत्तर तुमच्या माझ्या सर्वांसाठीच खूप लाखमोलाचे आहे. टाटा अतिशय नम्रपणे महणाले की, “मी कोण आहे, याला अजिवात महत्व नाही. ‘मी कसा आहे’, या गोष्टीला महत्व आहे.” एका छोट्या वाक्यात टाटांनी जीवनाचे सारच जणू सांगितले. जे सार आपल्याला कळण्यासाठी अनेक मंच चाळाने लागले असते. समजून घेण्यासाठी उभी हयात घालवावी लागली असती. काय म्हणाले टाटा, ‘मी कोण आहे’ यापेक्षा ‘भी कसा आहे’ हे महत्वाचे. लक्षात घ्या… तुम्ही कोण आहात म्हणजे गरीब आहात, गर्भश्रीमंत आहात बात्य टाटांच्या लेखी अजिबात महत्व नाही. तुम्ही कसे आहात म्हणजे कसे गागता बोलता, समाजात कसे वावरता याला महत्त्व आहे. हा सगळा प्रसंग टाटांच्या गाडीच्या चालकाने पाहिला व ऐकला होता.
यानंतर टाटा परदेशांत जाण्यासाठी एअरलाईन्स कंपनीच्या कार्यालयात गेले. तिथेही ‘मी करा आहे’ या टाटांच्या याक्याची प्रचिती त्यांच्या वर्तनातून पाहायला मिळाली. एअरलाईन्सचे तिकीट काढण्यासाठी टाटा सर्वसामान्यांप्रमाणे रांगेत उभे राहिले. कोणताही बडेजाव नाही की ‘मी कोणी वेगळा आहे,’ असा रुवाब नाही नाही तर आपण साध्या बससाठी रांग लावायची, तर कानकूस करतो. ‘हम जहाँ खड़े होते हैं… वहींसे लाईन शुरू होती है’, असा बच्चन स्टाईल आविर्भाव असतो आपला. पण टाटांची गोष्टच वेगळी होती व आहे. तिबल्या एअर लाईन्सच्या एका कर्मचाऱ्याने टाटांना पाहिले. तो घाईघाईत त्यांच्या जवळ आला. त्यांची तिकिटाची व्यवस्था लगेचच करतो, म्हणाला. टाटांनी ‘अशी सवलत नको’ असे स्पष्टपणे सांगून रांगेतूनच तिकीट घेतले, टाटांनी त्या कर्मचाऱ्यालाही सांगितले, “मी इथे उद्योगपती म्हणून नाही, तर सर्वसामान्य म्हणून उभा आहे. उद्योगपती ही माझ्या नावाची आधीची विरुदावली आहे. त्याला महत्त्व नाही, मी कसा आहे, याला महत्त्व आहे.” मोठ्या माणसांचा साधा विचार व प्रत्यक्ष कृती ही अशी असते.
रतनजी टाटा दोन बेडरूम्सच्या साध्या घरात राहत असत. त्यांचा साधेपणा अनेक वेळा पाहिलेला असल्याने त्यांच्या ड्रायव्हरने एकदा न राहवून विचारले, “साहेब, तुम्ही इतके साधे कसे राहता ? आम्ही तर अर्ध्या हळकंडानेही पिवळे होतो. आमच्याकडे आहे, त्याच्यापेक्षा जास्त दाखविण्याचा प्रयत्न करीत असतो. तुमच्याकडे तर सर्वकाही आहे. तरी तुम्ही अजिबात त्याचा तोरा मिरवत नाही.” त्यावर रतनजी यांनी त्यांच्या लहाणपणीची एक गोष्ट सांगितली. ते म्हणाले, “मी लहानपणी खूप उनाड होतो, खूप खोड्या करायचो. मला सांभाळायला एक दाई होती. एकदा माझ्या मनाविरुद्ध गोष्ट घडली म्हणून मी त्या दाईला लाथ मारली. ती बिचारी मालकाचा मुलगा म्हणून गप्प बसली. परंतु हा प्रसंग माझ्या वडिलांनी पाहिला. ते इतके संतापले, त्यांनी मला चांगलंच बदडून काढलं, ते मला म्हणाले, ‘तू कोण आहेस, हे महत्त्वाचं नाही; तर तू कसा आहेस, हे महत्त्वाचं आहे. हे तू जन्मभर लक्षात ठेव.” त्यांचं हे बोलणं माझ्या हृदयाला भिडले. तेव्हापासून मी कायम वडिलांचे ते शब्द आठवून त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो.”
तुम्हीही जरा सिहावलोकन केले, तर तुम्हाला कळून चुकेल, लोक आपली किंमत आपल्या वागण्याबोलण्यावर ठरवितात. टाटा जेव्हा कधी आपल्या फॅक्टरीला भेट द्यायला जातात, तेव्हा ते सर्वसामान्य कर्मचाऱ्यांमध्ये मिसळतात. त्यांच्याबरोबरच कँटीनमध्ये जेवण घेतात. कारखान्याच्याच गेस्ट हाऊसमध्ये मुक्काम करतात. मालकाचा तोरा न मिरविता ते सगळ्यांमध्ये सहज मिसळून जातात. जगभरात अनेक उद्योग असलेल्या टाटा समूहाचा प्रमुख, अनेक सेव्हन स्टार हॉटेलची मालकी, प्रतिष्ठित अशा फोर्ब्स ५०० यादीतील एक अग्रगण्य उद्योगपती… अशी ओळख असलेले रतन टाटा प्रत्यक्ष जीवनात किती साधे आहेत, माणुसकी जपणारे आहेत हे कळून येते. मी स्वतः टाटांकडून हे गुण आत्मसात केले. अर्थात आमची कधी भेट झालेली नाही. पण थोरामोठ्यांच्या चरित्रापासून काय शिकावे, हे सुदैवाने मला लवकर समजले. त्यांच्या अशा गुणांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी कायम वाटचाल केली आहे. त्याचा मला यशस्वितेच्या प्रवासात निश्चितच फायदा झाला.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
