उत्पादन व्यवसायात असलेल्या संधी आणि धोके
कोणकोणत्या प्रकारचे उत्पादनाचे व्यवसाय असू शकतात?
उत्पादन कोणत्याही वस्तूचे असू शकते. तुमच्या कल्पनाशक्तीच्या जोरावर तुम्ही विविध संधी तयार करू शकता. खाद्यपदार्थांचाच विचार केला तर लोणचे-पापड व्यवसाय, मसाले, बिस्किटे आणि कुकीज, स्नॅक्स आणि चिप्स, चॉकलेट आणि केक किंवा विविध सरबते अशी विविध उत्पादने असू शकतात. याशिवाय डिटर्जंट पावडर, अगरबत्ती, मेणबत्ती, टिश्यू पेपर, कागदी पिशव्या/कापडी पिशव्या तयार करू शकता. अन्न आणि खाद्य प्रकारातले व्यवसाय हे अगदी बारमाही चालणारे आहेत. लग्न, पार्टी तसेच रोजच्या जेवणात मसाले हे लागतातच. त्यामुळे हाही एक चांगला व्यवसाय आहे. मुख्य म्हणजे हे व्यवसाय हे घरातून करता येतील व कमी गुंतवणूक लागतील असे व्यवसाय आहेत. त्यामुळे सुरुवातीपासूनच खर्च कमी व कमाई जास्त होवू शकते.
बदलत्या काळातील जागरुकतेमुळे प्लास्टिक वस्तूंना आता लोक स्वत:हून नकार देवू लागले आहेत. प्लास्टिकला पर्याय शोधू लागलेत. तेव्हा अगदी पिशव्यांचाच विचार केला तर प्लास्टिक पिशव्यांऐवजी कापडी पिशव्या किंवा वाणसामानासाठी कागदी पिशव्या हे पर्याय जोर धरू लागलेत. याचा चांगला व्यवसाय होवू शकतो आणि त्याचा जम बसू शकतो. त्यातून मोठा नफा मिळू शकतो. अनेक प्रकारच्या व्यवसायात कच्चा माल लागतो. हा कच्चा माल पुरवणे हासुद्धा एक चांगला व्यवसाय आहे.
लेखक- अज्ञात
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v
