स्वतःला ओळखा, जग तुम्हाला ओळखेल
चिमणीचे तत्त्वज्ञान
एक मोठे जंगल होते. त्यामधून एक नदी वाहत होती. एका उन्हाळ्यात जंगलाला आग लागली, वणवा पेटला. सगळे प्राणी जीव वाचविण्यासाठी सैरावैरा धावू लागले. अशा वेळी एका चिमणीने मात्र ठडून न जाता आगीशी सामना करायच ठरविले ती आपल्या इवल्याशा चोचीत नदीचे पाणी आणून पेटलेल्या जंगलावर टाकू लागली. चिमणीचे हे काम हत्तीच्या कळपातील एका हत्तीने पाहिले. तो आश्चर्यचकित झाला व चिमणीला म्हणाला, “तुझा जीव केवढासा? त कितीही प्रयत्न केलास तरी आग विझणार आहे का? तु आधी स्वतःचा जीव वाचय.” त्यावर चिमणी म्हणाली, “माझ्याकडून ही आग विझली जाणार नाही. हे मलाही माहिती आहे. पण तुम्ही सगळे हत्ती एकत्र येऊन नदीतून सोडेत पाणी आणून ही आग नक्की विझवू शकता, हा विश्वास मला आहे.” त्यावर हत्तींनीही विचार केला आणि प्रयत्न करायचे ठरवले. हत्तींचा मोठा कळप सोंडेतन पाणी आणून वणव्यावर टाकतो व काही वेळाने खरोखरच आग आटोक्यात आली. एवका मोठ्या हत्तीलाही त्याच्या ताकदीची जाणीव करून द्यावी लागते. हे या गोष्टीवरून कळते. त्यासाठी चिमणीने केलेला प्रयत्न किती मोठा व यशस्वी ठरला, हेही आपल्याला कळलेच असेल. आत्मविश्वासाच्या बळावर प्रगतीचे शिखर सहज सर करता येते बाचे, हे उत्तम उदाहरण आहे.
विश्वास, आत्मविश्वास व इच्छाशक्ती
असे म्हणतात ‘इच्छा असेल, तर मार्ग दिसेल’, जबरदस्त महत्त्वाकांक्षा असलेला एक तरुण एका महात्याकडे जातो व ‘मला यशस्वितेचा गुरुमंत्र द्या,’ अशी विनवणी करतो. महाराज म्हणतात, “उद्या सकाळी मी गंगास्नानासाठी जाताना तू माझ्याबरोबर ये. तिथे स्नान करताना मी तुला हवा तो गुरुमंत्र देतो.” ठरल्याप्रमाणे भल्या पहाटे महाराज स्नानाला निघालेले असताना तो तरुण त्यांच्याकडे पोहचतो. दोघेही नदीत उतरतात. महाराज त्याला आपल्यासमोर उभे करून सूर्याला अर्घ्य द्यायला व शरीर सैल सोडण्यास सांगतात. तरुण त्याप्रमाणे करतो. त्यावर महाराज त्याचे दोन्ही खांदे दाबून त्याला पाण्यात पूर्ण बुडवितात. वीस-पंचवीस सेकंद गेल्यावर तो तरुण बाहेर येण्यासाठी धडपड करू लागतो. पण महाराज त्याच्यावरील दाब अजून वाढवितात. त्यामुळे तरुणाला अधिक धडपड करावी लागते. शेवटी तो पूर्ण ताकद लावून महाराजांचे हात बाजूला करतो व पाण्याच्या वर येतो. जोरात श्वास घेतो. तो जरा चिडलेलाच असतो. “गुरुमंत्राऐवजी हे काय करीत आहात?” असे तो विचारतो. त्यावर महाराज त्याला म्हणतात, “पाण्यात असताना तुला सर्वात जास्त गरज कशाची वाटली, तर हवेची, ऑक्सिजनची. त्यासाठी तू प्रचंड धडपड केलीस. आयुष्यातील यशाचेही असंच आहे, यशस्वी व्हायचं असेल, तर प्रचंड इच्छाशक्तीचीही गरज असते. त्यासाठी काहीही करायची तयारी ठेवली पाहिजे. आत्मविश्वास व इच्छाशक्ती तीव्र असेल, तरच आपण कोण आहोत, हे आपल्याला समजतं. मला मरण्यापूर्वी यशस्वी व्हायचंय, अशी इच्छाशक्ती एकदा तयार झाली की, आपल्याला यशस्वी होण्यापासून कोणी रोखू शकत नाही.”
यासाठी मित्रांनो आपण प्रोफेशनल बनलं पाहिजे. Professional means who achieve only positive and positive result day by day. कालपेक्षा आज व आज पेक्षा उद्या माझ्या कामामध्ये प्रगतीच झाली पाहिजे, याला म्हणतात प्रोफेशनल. माझे कार्यक्षेत्र ही माझी रणभूमी आहे. मी एक योद्धा आहे. मी शपथ घेतो की, मला सर्वोत्कृष्ट यश मिळेपर्यंत मी लढतच राहणार, हार मानणार नाही. कारण मी एक योद्धा आहे. रणझुंजार आहे.. प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्या काही ओळी मला दरवेळी प्रेरणा देतात, त्या मुद्दाम आपल्यासाठी देतो…
जिदगी है तो ख्वाब है, ख्वाब है तो मंजिले है।
मंजिले हैं तो फासले हैं, फासले हैं तो रास्ते हैं।
रास्ते हैं तो मुश्किलें है, मुश्किले है तो हौसला है।
हौसला है तो विश्वास है, और विश्वास है तो जीत है।
क्योकी फायटर हमेश जितता है…
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
