अपयश ही यशाची पहिली पायरी नाही !
यशापयश, सुखदुःख, गरिबीश्रीमंती या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जिथे यश असते, तिथेच अपयशही असते. चूक करणे ही माणसाची प्रवृत्ती, चुकीचा स्वीकार करणे ही संस्कृती व ती सुधारणे ही प्रगती. तुम्हाला जर कोणी असे विचारले की, ‘तुम्हाला यशस्वी व्हायला आवडेल का?’ हा प्रश्न ऐकताच तुम्ही काय म्हणाल, ‘काही पण काय विचारता? यशस्वी व्हायला कोणाला नाही आवडणार?’ असा प्रतिप्रश्न तुम्ही समोरच्याला कराल… हेच उत्तर सगळ्यांकडून नक्की येईल. पण यशस्वी व्हायचे म्हटले, तर एक सर्वात मोठी गोष्ट तुम्हाला कायम लक्षात ठेवावी लागेल. ती म्हणजे यशस्वी व्हायचे तर अपयशाला घाबरायचे नाही… नाही म्हणजे नाहीच! आता अपयश म्हणजे काय आणि यश म्हणजे नेमके काय, हे एकदा समजले, तर तुमच्या मनातील अपयशाची भीतीही आपोआप दूर होईल.
मित्रांनो, चांगल्या व पर्मनंट यशासाठी ‘बडी सोच, कड़ी मेहनत और पक्का इरादा’ आवश्यक असतो. यशापयश, सुखदुःख, गरिबीश्रीमंती या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जिथे यश असते, तिथेच अपयशही असते. यश आणि अपयश यातील सीमारेषा इतकी अस्पष्ट, धूसर असते की, ती कधी पार झाली किंवा किती जवळ आली हे कधीच दिसू शकत नाही. उदाहरणच द्यायचे झाले, तर आपण सगळे विज्ञानात शिकलो आहोत की, पाणी १०० अंश सेल्सिअस तापमानाला उकळते. त्यानंतरच पाण्याची वाफ होते व या वाफेवर अनेक यंत्रे चालतात.. रेल्वे धावते, विमान उडते, मोठे यंत्र चालू होते अशा अनेक गोष्टी वाफेच्या शक्तीवर चालतात. मात्र ९९ डिग्री व १०० डिग्रीमधला फरक पाण्यात बोट घालून कळणारच नाही, त्यासाठी आपल्याला तापमापकाची गरज पडते. तसेच यश आणि अपयशाचेही परिमाण मोजतानाही अशाच कोणत्या तरी माध्यमाची गरज लागते.
प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला अपयशी माणसे जास्त दिसतील. यशस्वी झालेली मंडळी कमी दिसतील. आता जास्त अपयशी माणसे दिसल्यावर तुमचाही आत्मविश्वास कमी होऊ शकतो. असे होऊ द्यायचे नसेल, तर तुमची दृष्टी तुम्ही बदलली पाहिजे. तुमची नजर फक्त आणि फक्त यशस्वी लोकांकडेच असायला हवी. महाभारतात अर्जुनाला जसा झाडावर ठेवलेल्या पोपटाचा फक्त डावाच डोळा दिसत होता, तसे तुमचे लक्ष यश, आनंद, श्रीमंतीकडे केंद्रित व्हायला हवे.
तुम्ही पाल्याला शाळेत प्रवेशासाठी घेऊन गेल्यावर तुम्ही सहज चौकशी करता… शाळेचा निकाल किती आहे, शिक्षक कसे आहेत वगैरे वगैरे… तुम्ही शाळेत विचारले की, ‘तुमच्या शाळेत कोणी नापास होतं का?’ समोरून उत्तर येते, ‘हो, आमच्या शाळेत काही मुलं नापासही होतात.’ तुम्ही विचार कराल, ‘या शाळेत मुलं नापास होतात, इथं आपल्या पाल्याला प्रवेश नको.’ तुम्ही मग आणखी शाळांमध्ये चौकशी करता, पण प्रत्येक ठिकाणी तुम्हाला नापास आढळतीलच. तुम्ही पुन्हा प्रश्न केला की, ‘तुमच्या शाळेतील सगळीच मुलं अधिकारी, यशस्वी उद्योजक वगैरे होतात का?’ आता याचेही उत्तर नकारात्मकच मिळेल, अशी एकही परिपूर्ण शाळा तुम्हाला मिळणार नाही. मग तुम्ही तुमच्या पाल्याला घरीच बसविणार का? नाही बसविणार. कोणत्या ना कोणत्या
शाळेत तुम्ही त्याला प्रवेश मिळवून देणारया आता अशा परिस्थितीत आपली दूरदृशी आपल्या मदतीला येते. डोळ्याने जे दिसते, त्याला दृष्टी म्हणतात व दूसरीच्या पलीकडे एक सृष्टी असते, ती ज्याला दिसते, त्याला दूरदृष्टी किंवा दिव्यदृष्टी लाभली असे म्हणतात. महाभारतात कुरुक्षेत्रावर सुरू असलेल्या महायुद्धाची लाईव्ह कमिट्टी महाराज धृतराष्ट्राला हस्तीनापुरात बसून संजय सांगायचा. काही पौराणिक मालिकांमध्ये आपण पाहिले असेल की, स्वर्गात बसलेले देव डोळे मिटतात व स्थांना पृथ्वीवर कुठे काग चालले आहे हे दिसते. त्यांच्याकडे ती दिव्यदृष्टी असते. त्यांच्याकडे देवपण असते. खरे तर एखाद्या क्षेत्रातील मोठे यश म्हणजे माणसातील छोटे देवपणच आहे, असे मला वाटते.
मित्रांनो, मोठ्या यशाची सुरुवात ही अवघड असते, ती एका विशिष्ट संच लयीतच होते. सुरुवातीला जास्त द्यावे लागते व मिळताना फारच कमी मिळते. इनपुट जास्त आणि आऊटपुट कमी अशी परिस्थिती असते. जुन्या काळातील रेल्वेत हिरवा सिग्नल मिळाल्यावर ड्रायव्हर इंजिनाचे अॅक्सलेटर जोरात दाबतो. कोळगे टाकणारे जास्त कोळसे टाकतात. तेव्हा रेल्वेचा वेग पाच ते दहा कि. मी. इतकाच असतो. वरती पुराचे लोट हवेत पसरत असतात. हीच रेल्वे पाच-दहा मिनिटानंतर मोसममध्ये येते, त्यावेळी अॅक्सलेटर कमी केला जातो, कोळसाही कमी टाकण्यात येतो, तरीही रेल्वेचा वेग ताशी शंभर कि. मी.च्या पुढे गेलेला असतो. यशाचेही असेच आहे, सुरुवातीला खूप कष्टाचे इनपुट द्यावे लागते. मग काही काळाने आऊटपुट वेगवान होते.
घरातील भितीवर उगवत्या सूर्याचे किया पळणाऱ्या घोड्यांचे चित्र लावून लोक यशस्वी होत नसतात. त्यासाठी आळस झटकून सूर्योदयापूर्वी उठून घोडयाच्या वेगाप्रमाणे कर्माची घोडदौड करावी लागते. असेच लोक जीवनात यशस्वी होतात. यशासाठी अपयश पचवावे लागते. सहनशक्ती पाहिजे असते, धीर धरावा लागतो. वेगवेगळे पर्याय तयार ठेवावे लागतात. काही काळ बहिरे व्हावे लागते. मागे परत जाण्याचे दरवाजे बंद कराने लागतात.. तेव्हा कुठे यश मिळते.
मराठी माणसे नेहमी म्हणतात की, ‘अपयश ही यशाची पहिली पायरी आहे..’ मला वाटते हे अजिबात खरे नाही. पहिली पायरी ही खूप मोठी व अवघड असते. इथेच अनेक लोक फेल होतात. खरे तर मराठी माणसे लेझीम खेळल्याप्रमाणे व्यवसाय करतात. लेझीममध्ये एक पाऊल पुढे टाकले की, दोन पावले मागे जातात. असेच व्यवसायात थोडे अपयश आले की, लगेच मागे हटतात. लोक त्यांना मागे सारतात. अनेक जण तर ‘तुला कोणी सांगितला हा धंदा करायला?’ या वाक्यानेच ढेर होतात.
अपयश पदरी पडते, तेव्हा ९९ टक्के लोक नशिबाला किंवा परिस्थितीला दोष देतात. ही स्वतःची सुटका करून घेण्याची पळवाट असते. खरे तर ते अपयश नसून आपल्या काही चुका असतात. चूक न उमजणे व तिचा स्वीकार न करणे ही मोठी घोडचूक असते. यशासाठी आधी चूक शोधून त्याची पुनरावृत्ती होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे.
अपयश ही यशाची पाहिली पायरी नाही, तर Acceptance and correction of the mistake is the first step towards success. याचा अर्थ चुकांचा स्वीकार करून त्यात सुधारणा करून मार्गक्रमण केले, तर लोक यशस्वी होतात. आता चूक म्हणजे काय हे समजून घेऊयात… प्रत्येकाला असे विचारलं की, “शाळा-कॉलेजमध्ये असताना तुम्ही कोणी चुका केल्या का? आईवडिलांशी, थोरामोठ्यांशी वागताना तुम्ही कधी चुकला आहात का? मित्र- नातेवाईकांना समजून घेण्यात तुम्ही कधी चुकला आहात का? या सगळ्या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे दिली, तर सगळेच सांगतील, “आम्ही काही वेळा चुकलो आहोत.” अशा चुका होणे हा काही गुन्हा नाही. पण तीच चूक पुन्हा पुन्हा करणे हा मात्र यशस्वितेमधील एक मोठा गुन्हा आहे. माहिती नसताना अजाणतेपणी झालेली चूक ही चूकच नाही. पण एकदा कळले की, ही चूक आहे, तर मग आयुष्यात तशी चूक करू नका. मित्रांनो, तुम्हाला यशाकडे जायचे असेल, तर तुम्हाला एक दोन नाही तर एक हजार चुका माफ आहेत. अट फक्त एवढीच आहे की, एकच चूक पुन्हा करायची नाही. माझा दावा आहे की, या वाटचालीत तुम्ही फक्त दहा
ते बीत चुका कराल. त्यापेक्षा जास्त चुका तुमच्याकडून होऊय शकत नाही. अपयशी लोक चुका करून त्या मान्य करत नाहीत – हाच त्यांच्यातील सर्वांत मोठा दोष असतो. अशी माणसे जीवनात कधीच यशस्वी होऊ शकत नाहीत, असे मला ठामपणे वाटते.
मिर्शनी, शाळेत असताना तुम्ही पाठीमागे खोडरबर असलेली पेन्सिल नक्कीच पाहिली असेल, वापरली असेल. रबर कशासाठी असते, तर पेन्सिलीने लिहिताना काही चुकले, तर लगेच ते खोडता यावे यासाठी एखाद्याला चुकून पाय लागला, तर आपण त्याला लगेच ‘सॉरी’ म्हणतो, दिलगिरी व्यक्त करतो. समोरचाही लगेग माफ करतो. कधी कधी हसून प्रतिसाद देतो. पण आपला पाय पुन्हा पुन्हा त्याला लागत असेल, मलेही तो चुकून का असेना, मग समोरचा काही पुढच्या वेळी आपल्याला माफ करणार नाही। आपण मुद्दामच लाथा मारतोय व ‘सॉरी’ म्हणण्याचे नाटक करतोय, असाच त्याचा समज होईल. म्हणूनच चूक करताना त्याची पुनरावृत्ती टाळलीच पाहिजे. चूक करणे ही माणसाची प्रवृत्ती आहे, चुकीचा स्वीकार करणे ही संस्कृती आहे व पुन्हा ती चूक न करणे किंवा चूक सुधारणे ही माणसाची प्रगती असते.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v
