यशाचे गुपित
यश अपयश समजून घ्या
यश म्हणजे Success तर अपयश म्हणजे Failure. Success च्या स्पेलिंगमध्ये S तीन वेळा येते, तर C दोन वेळा येते. Failure च्या स्पेलिंगमध्ये एकही अक्षर रिपीट होत नाही. म्हणूनच यश हवे असेल, तर एकच काम सातत्याने करा, त्याची आवर्तने करा. यश हमखास मिळते. समजा, तुम्हाला शेतात बोअरवेल घ्यायची आहे. त्यासाठी ५०० फुटांपर्यंत खोदाई करावी लागणार आहे. तुम्ही म्हणाल की, ‘मी वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येकी १० फुटांप्रमाणे ५० वेळा खोदेन व एकूण ५०० फूट खोदाई करेन.’ असे करून चालेल का? तुम्हाला पाणी लागेल का? अजिबात लागणार नाही. पाण्यासाठी तुम्हाला एका विशिष्ट ठिकाणीच सलग ५०० फूट खोदाई करावी लागेल. यशाचेही असेच असते, एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करून सातत्याने काम करीत राहिले पाहिजे. ‘एक ना धड भाराभर चिध्या’ असे करून काही उपयोग नाही.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v
