यशाचे गुपित
संघर्षाशिवाय विजय नाही
मेगा सक्सेससाठी प्रचंड संघर्ष अटळ असतो. टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडालाही देवपण येत नाही. मग आपल्याला यश हवे असेल; तर कष्ट, स्मार्ट वर्क, संघर्ष करावाच लागतो. ज्यांनी कष्टाने मेगा सक्सेस मिळविले आहे, अशा महान लोकांचे चरित्र अभ्यासा. त्याचे मनन करा. चांगल्या गोष्टी आत्मसात करा. ते किती ध्येयवेडे होते, हे समजून घ्या. माझ्या मते अशा यशस्वी लोकांमध्ये इमोशनल ड्रीम (भावनात्मक स्वप्न) निर्णायक भूमिका बजावते. मला माझ्या आईवडिलांची, आजीआजोबांची स्वप्ने पूर्ण करायची होती. त्यांना मी ‘साहेब’ झालेला पाहायचे होते, आपल्या दारात एक ‘जिपर्ड’ आलेले पाहायचे होते. हे स्वप्न ते माझ्यात पाहत. त्यामुळे मी त्यांच्या स्वप्नाशी भावनिकदृष्ट्या गुंतलो. या जोरावरच मी स्टेट बँकेत साहेब झालो. पुढे स्वतःच्या व्यवसायात मोठे यश मिळविले. जिपडे काय घेऊन बसलात, एकाहून एक भारी गाड्या माझ्या दारात आल्या. मी कष्टाला कधी घाबरलो नाही, कष्ट केल्याने कोणी मरत नसते, तर फक्त यशस्वीच होत असतात. मी आधी हे केले, मगच तुम्हाला सांगतोय.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v
