यशाचे गुपित
यशासाठी नेमके काय करावे?
ज्यांना सुंदर स्वप्ने पाहता येतात, त्यांच्यासारखे सुदैवी तेच. कारण हीच स्वप्ने ती पुढे वास्तवातही आणू शकतात. यशासाठी तुमच्यात इच्छाशक्ती, महत्त्वाकांक्षा, कष्टाची तयारी, प्रामाणिपणा व वक्तशीरपणा आवश्यक आहे. तुम्ही महत्त्वाकांक्षी असणे आवश्यक असते, तुमच्याकडे ध्येय असले पाहिजे. त्याशिवाय तुम्ही कष्ट तरी कसे करणार? तुम्ही कष्टाळूही असायला हवे. ध्येय आहे, पण ‘दे रे हरी पलंगावरी’ अशी वृत्ती असेल; तर ध्येयाकडे वाटचाल करणार कशी? कदाचित तुमच्याकडे ज्ञान नसेल, गुणवत्ता नसेल; पण कष्टाची तयारी असेल, तर या गोष्टी सहज मिळविता येतात. यशासाठी प्रामाणिकपणाही तितकाच गरजेचा आहे. आधी स्वतःशी प्रामाणिक राहायला शिका. नंतर इतरांशी प्रामाणिक राहण्याची सवय लागते.
You can fool all the people some of the time and some of the people all the time, but you cannot fool all the people all the time. म्हणजे तुम्ही काही लोकांना पूर्ण वेळ किंवा सर्व लोकांना काही वेळ मूर्ख बनवू शकता, पण सर्व लोकांना प्रत्येक वेळी मूर्ख बनवू शकत नाही. म्हणून माणसाने नेहमी प्रामाणिक असले पाहिजे. सत्यवादी राहिले पाहिजे.
वेळेचे महत्त्व जाणा
वेळेच्या बाबतीत मराठी माणूस खूप निष्काळजी असतो. कोणतीच गोष्ट वेळेवर करीत नाही. त्यामुळे मराठी माणूस जगाच्या खूप मागे राहतो. ‘चलता है, इंडियन स्टैंडर्ड टाईम है’ अशी फुशारकी मारून तो वेळकाढूपणा करतो. त्यामुळे परदेशांतील लोक आपली खिल्ली उडवितात, कारण ते वक्तशीरपणाला महत्त्व देतात.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v
