यशाचे गुपित

यशाचे गुपित

मला जमणार नाही

अनेकदा आपण सहजपणे म्हणतो, “ते काम चांगलं आहे, पण मला ते जमणार नाही. मी पूर्वी ते काम केलेलं नाही.” अशा सबबी सांगत बसतो. मला सांगा, आपला जन्म झाल्यावर लगेचच आपल्याला चालता, बोलता येत होते का? या सगळ्या गोष्टी आपण हळूहळू शिकलो. का शिकलो, तर या गोष्टी शिकलो नाही, तर आपण धड जगू शकत नाही, हे आपल्याला नकळत कळले म्हणून. सुरुवातीला आपल्याला सायकल तरी चालविता येत होती का? चार-पाच वेळा धडपडून आपण ती शिकलो. सायकल चालविताना पडायची भीती वाटते, म्हणून आपण प्रयत्न करणे सोडले नाही. एकदा सायकल चांगली चालविता यायला लागल्यावर पडायची भीतीही आपोआप गायब होतेच ना. नंतर तर आपण पडायचेच विसरून जातो. पडण्यामध्ये कधी कोणी पीएचडी मिळविली का?’मला जमणार नाही’ असा नकारात्मक विचार करण्यापेक्षा ‘मी ते करणारच’ असा सकारात्मक विचार करा. ‘मला ही गोष्ट सहज जमू शकते,’ असे मनाला सांगत रहा. ‘त्याशिवाय मी जगूच शकत नाही, अशक्य ते शक्य करून दाखवेनच’ अशी वृत्ती वाळगल्यावर कोणतीच गोष्ट न जमण्यासारखी राहणार नाही.

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

 

 

error: Content is protected !!