Leadership नेतृत्व म्हणजे काय ?

Leadership नेतृत्व म्हणजे काय ?

 

It is the lifting of mans vision to higher sights नेतृत्व करणं म्हणजे माणसांच्या दूरदृष्टीला उंचावणे. म्हणजे काय तर सहकाऱ्यांना दूरदृष्टी देणं आणि त्यांची दृष्टी उंचावणं ही दोन्ही काम घडवून आणणं म्हणजे नेतृत्व. फक्त आपणच दूरदृष्टी ठेवायची आणी स्वतः साठी वरची दृष्टी घ्यायची हे काम नाही. आपल्या सहकाऱ्यांना अगोदर उंचीवर नेणं आणि तेथून त्यांना दूरचे ध्येय दाखविणे याला नेतृत्व म्हणतात. स्वाभाविक आहे पहा आपण जेवढ्या उंच इमारतीवर उभे राहू तेवढ्या उंचीवरुन सभोवतालचे चित्र अधीक विहंगम दिसते, स्पष्ट दिसते. डोळे तेच असतात पण अडथळे दूर केल्यामुळे लांबचे दिसते आणि लांबचे दिसण्याचे आणखी एक कारण म्हणजे उंचीवर गेल्यामुळे साहाजिकच मध्ये येणारे अडथळे तोकडे पडले.

Raising of mans performanace to higher standards. माणसाची प्रगती करुन त्याचा दर्जा वाढविणे. आपल्या सहकाऱ्याची कर्मचाऱ्यांची प्रगती वेगाने होईल आणि त्यांच्या जीवन मानाचा दर्जा वाढेल अस काम करणं म्हणजे नेतृत्व करणं होय.

The building of mans personality beyond its normal limita- tions.

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://chat.whatsapp.com/GP2BjWKvfME6K0nuhRLl4W

error: Content is protected !!