योग्य निवड करा
नरेंद्र मोदीनी स्वतः स्वतःचं क्षेत्र निवडलं आणि चहा विकणारे नरेंद्र मोर्दीनी देशाचे पंतप्रधान होऊन स्वतःच्या नावाचा डंका जगात वाजविला. पण राहुल गांधींना रेडिमेड मिळालेल्या क्षेत्राचं सोनं करता आलं नाही. कारण त्यांना त्यांचे क्षेत्र विरासतमध्ये मिळालं आहे. अमिताभ बच्चन हे आपल्या आवडीच क्षेत्र निवडून अनेक ठोकरा खाऊन, अपयश पचवून फिल्म इंडस्ट्रीतले शहंशाह झाले आणि अभिषेक बच्चनला विरासतमध्ये फिल्म इंडस्ट्री मिळाली पण… अशी अनेक उदाहरणं आपल्या डोळ्यापुढे असतात.
असे म्हणतात की लादले जाते ते ओझे आणि स्वीकारली जाते ती जबाबदारी. म्हणूनच तुम्ही जबाबदारी स्वीकारून काम करा आणि जीवनात यशस्वी व्हा. Life is a serious thing, don’t take it lightly सिरीयसनेस काय असतो. सिरीयसनेस म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींवर बारीक लक्ष द्यावं लागतं. जसं आयसीयूमधील पेशंटचा तासातासाला बीपी चेक केला जातो. नर्स तासातासाला गोळ्या, इंजेक्शन, सलाईन देत असते. पेशंटच ईसीजी मॉनिटर केला जातो. म्हणूनच सिरीयस पेशंट बरा होतो. याउलट जनरल वॉर्ड मधील पेशंटला दिवसातून एक दोनदा चेक केले जाते. तिथे गट असते. म्हणूनच सिरीयस पेशंटचा वेगळा वॉर्ड असतो.
असे म्हणतात Success demand sacrifice. त्यागाशिवाय यश मिळत नसते. त्याग, तपश्चर्या आणि तत्परता हे यशाचे तीन ‘त’कार असतात. ज्यांना प्रचंड यश मिळालेले असते त्यांनी या तीनही गोष्टी केलेल्या असतात. म्हणून तुम्ही गरीब असाल किंवा नसाल पण वरील गुण, सवयी आत्मसात करा आणि जीवनात यशस्वी व्हा.
नवनाथ धुमाळ साहेब
94231 62548
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
