Leadership नेतृत्व म्हणजे काय ?

Leadership नेतृत्व म्हणजे काय ?

 

माणसाला त्यांच्या सर्वसामान्य मर्यादेतून बाहेर काढून त्यांच्या व्यक्तीमत्वाचा विकास करणं त्याच्या एकंदरीत मनुष्याच्या जन्माला येण्याचं सार्थक करणं म्हणजे नेतृत्व करणं.

मित्रांनो पहा ही व्याख्या एकोणीसाव्या शतकात केली गेली आणि त्याची प्रत्यक्ष कृती मात्र महाराजांच्या रुपाने १६ व्या शतकात झाली. कदाचित महाराजांच्या जीवनाकडे पाहूनच या पाश्चात्य व्यवस्थापन तज्ञांनी नेतृत्वाची व्याख्या केली असावी. महाराजांच्या जीवनाची ध्येय आणि उद्दीष्टे यांच्या किती जवळ जाणारी अशी ही

व्याख्या पिटर यांनी केली आहे.

या व्याख्येचा एकंदरीत अर्थ केला तर ती अशी होते की नेतृत्व करणं म्हणजे खुषमस्करे गोळा करणे नव्हे तर माणसाला दृष्टी देणे, त्याची प्रगती करणे आणि एकंदरीत त्याच्या जीवनाचं कल्याण करणं होय.

आता आपल्या देशातील किती नेते या व्याख्येत बसतात ते तुमचं तुम्ही पहा. सहकारातून समृद्धिकडे पण कोणाच्या तर फक्त नेत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या नव्हे.

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://chat.whatsapp.com/GP2BjWKvfME6K0nuhRLl4W

error: Content is protected !!