आदर्श व प्रेरणा… यशाचा राजमार्ग
सेवा उद्योगातील अंबानी बी. व्ही. जी. ग्रुपचे श्री. हणमंतराव गायकवाड
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव जवळच्या रहमतपूर येथे शेतकरी कुटुंबात श्री. हणमंतराव गायकवाड यांचा जन्म झाला. फक्त दोन एकर कोरडवाहू शेती आणि राहण्यासाठी छप्पर हे त्यांचे प्रारंभीचे विश्वा अशा स्थितीत ‘कमवा व शिका’ या पद्धतीने त्यांनी शिक्षण घेतले. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी वडिलांचे छत्र हरपले, नंतर आईने शिलाई मशीनवर कपडे शिवून व अन्य छोटीमोठी कामे करून हणमंतरावांना इंजिनिअर चनविले, छत्रपती शिवाजीमहाराज व स्वामी विवेकानंद यांना आदर्श मानून खाजगी नोकरी करीत असतानाच साईड बिझनेसही सुरू केला. बीव्हीजी अर्थात ‘भारत विकास ग्रुप’ची स्थापना केली. त्याद्वारे स्वच्छता करण्याचे अर्थात हाऊस किपिंगसह अनेक क्षेत्रांत कामे सुरू केली. कोणत्याही कामाची लाज बाळगली नाही. कोणत्याही कामाला नाही म्हणायचे, नाही हे धोरण ठरविले. ‘मला येत नाही, मला जमणार नाही,’ हे शब्दच दूर ठेवले. आज BVG India Ltd. ही भारतातील सर्वात मोठी इंटिग्रेटेड सर्व्हिस कंपनी आहे. ‘There is no defeat of hard work and sincerity in this world. Your non core business is our core business’ हे हणमंतराव यांचे ब्रीद आहे.
बीव्हीजी कंपनी आशिया खंडात सर्वात मोठी पोलीस सेवा देते. महाराष्ट्रात १०८ अँब्युलन्स सेवा देतात. तांत्रिक हाऊस किपिंगमध्ये भारतात प्रथम क्रमांकावर ही कंपनी आहे. या कंपनीकडून दररोज १०० ट्रेन स्वच्छ केल्या जातात. ८० हजार कर्मचारी भारतातील २० राज्ये व ७० शहरांत कार्यरत आहेत. दररोज ३५ रेल्वेस्थानके स्वच्छ केली जातात. या कंपनीने पाच लक्ष झाडे लावली आहेत व त्यांचे संवर्धनही केलेले आहे. बीव्हीजीचे प्रमुख ग्राहक म्हणजे राष्ट्रपती भवन, संसद भवन, सर्वोच्च न्यायालय, टाटा, बजाज, महिंद्रा, जीवन विमा, ओएनजीएल हे होय. बीव्हीजी सध्या हाऊस किपिंग, लँडस्केपिंग, गार्डनिग, लॉजिस्टिक, ट्रान्स्पोर्ट अशा अनेक प्रकारच्या सेवा देण्याचे काम करते. सेवा उद्योगातीलच ९५० रुग्णवाहिका मोफत सेवा देत आहेत.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v
